घरकूल योजनेचा लाभ न मिळाल्यास २६ जानेवारीला उपोषण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:23 AM2021-01-13T05:23:28+5:302021-01-13T05:23:28+5:30
निवेदनात म्हटले आहे की, नवापूर नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना शासनामार्फत घरकूल योजनेचा लाभ मिळालेला आहे, परंतु लाभार्थींच्या खात्यात अद्याप या ...
निवेदनात म्हटले आहे की, नवापूर नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना शासनामार्फत घरकूल योजनेचा लाभ मिळालेला आहे, परंतु लाभार्थींच्या खात्यात अद्याप या योजनेच्या लाभाची रक्कम मिळालेली नसून अधिकाऱ्यांना विचारले असता, उडवाउडवीची उत्तरे त्यांच्याकडून मिळतात. लाभार्थ्यांना आजतागायत केवळ एक लाख रुपये प्राप्त झालेले आहे. संबंधित अधिकारी वेळ मारून नेतात. त्यामुळे लाभार्थींना भविष्यात उघड्यावर राहण्याची वेळ येऊ शकते. याबाबतची संपूर्ण जाणीव संबंधित अधिकाऱ्यांना असूनही ते टाळण्याचा प्रयत्न करीत असून, लाभार्थ्यांना अधिकारापासून वंचित ठेवत आहेत, असे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. हक्क मिळावा, म्हणून उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. उपोषणकर्ते उमेश बापू पवार व पूनम राजपूत हे २६ जानेवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकदिवसीय उपोषणास बसणार असल्याचे निवेदन म्हटले आहे. उपोषणाच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेस काही बाधा उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील, असे निवेदन उमेश बापू पवार, राहुल शिरसाठ, संजय पोपट सोनवणे, पूनम लक्ष्मण राजपूत, लिलावती लक्ष्मण राजपूत, मुक्ताबाई शांताराम गावीत, धर्मिष्ठा नीलेश मावची, अरुणा शांतू मावची, बापू पवार, बाबू मावची, प्रमिला मावशी, अल्लाउद्दीन खाटीक, लता खैरनार, संगीता वाडेकर, मीराबाई महाले आदींनी मुख्याधिकारी चौधरी यांना दिले.