कुणी घर विकले तर कुणी शेती : नंदुरबारातील बोगस शिक्षकांची नियुक्ती प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:32 PM2018-02-20T12:32:53+5:302018-02-20T12:32:53+5:30
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कुणी घर तर कुणी शेती विकून शिक्षकाची नोकरी लागणार म्हणून पैसे भरले, कुणाला नोकरी लागली म्हणून लगअ ठरले आता असे पैसे ही गेले व ठरलेले लगअ देखील मोडीत निघण्याची वेळ अनेक युवकांवर आली आहे. अपंग युनिटअंतर्गत जिल्हा परिषदेत शिक्षकाची नोकरी मिळवून देतो म्हणून रॅकेट चालकांनी अनेक युवकांना त्यांच्या कुटूंबियांना हेरून पैसे लाटले. आता रॅकेटमधील कुणीही भेटत नाही आणि मोबाईलही स्विच ऑफ येत असल्यामुळे युवक हवालदिल झाले आहेत.
अपंग युनिटअंतर्ग जिल्हा परिषदेत भरती होत असून काम करायचे असल्यास अमूक रक्कम लागेल म्हणून धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील गेल्या दोन ते तीन वर्षापासून सक्रीय असलेल्या रॅकेटने गरजु कुटूंब आणि बेरोजगार युवकांना हेरले. त्यांची मानसिकता करून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले. बोगस कागदपत्रे, नियुक्तीपत्र तयार करून काहींना रूजूही करून दिले. तर काहींचे पैसे घेवून ठेवले. परंतु बिंग फुटल्याने आणि गुन्हा दाखल झाल्याने अनेक युवकांच्या स्वप्न भंगले तर काही कुटूंबांच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले आहे.
शेती व घर विकले
जिल्हा परिषदेत शिक्षकाची नोकरी मिळत आहे म्हटल्यावर अनेकांनी त्यासाठी तयारी दर्शविली. यापूर्वी ज्यांना नियुक्ती मिळाली त्यांचा अनुभव पहाता काही कुटूंबांनी आपल्याकडे असलेली शेती विकली, काहींनी गहान ठेवली, कुणी घर गहान ठेवले आणि रॅकेटमधील दलालांकडे पैसे भरले.
यापैकी 25 ते 30 जणांना नियुक्ती मिळालीही, परंतु पगार काही सुरू होत नव्हता. आज ना उद्या पगार सुरू होईल या अपेक्षेवर असतांनाच गेल्या आठ दिवसांपासून चौकशीचा ससेमिरा आणि त्यानंतर थेट गुन्हेच दाखल झाल्याने असे युवक आता वा:यावर आहेत. त्यांचे कुटूंब पुर्णपणे उध्वस्त झाले असून गुन्हे दाखल होऊन अटक होईल या भितीने संबधीत फरार देखील झाले आहेत.
याच युवकांमधून चार ते पाच जणांचे नोकरी लागली म्हणून लगअ देखील ठरले आहे. आता बिंग फुटल्याने लग्न देखील मोडण्याची भिती त्यांच्या कुटूंबियांना सतावत आहे. पैसेही गेले, प्रतिष्ठाही गेली आणि लगअही मोडीत निघाल्याने अशा युवकांची मनस्थितीची कल्पनाही करता येत नसल्याची स्थिती आहे.
दलाल गायब
रॅकेटमधील ज्या दलालांनी अशा युवकांकडून पैसे घेतले आहेत ते दलाल आता गायब झाले आहेत. त्यांचे फोनही स्विच ऑफ येत आहेत. त्यांना शोधावे तर कुठे, पैसे कसे परत मिळतील यासाठी संबधीत युवक प्रयत्नशील आहेत.
युवकच गुन्हे दाखल करतील
ज्या युवकांना रॅकेटमधील दलालांनी फसवले आहे असे युवकच आता संबधीत दलालांवर गुन्हे दाखल करण्याची शक्यता आहे. ज्यांना नियुक्तीपत्र दिलेले नव्हते अशा युवकांचे पैसे टप्प्याटप्प्याने परत करण्याची तयारी काही दलालांनी चालविल्याची चर्चाही सुरू आहे.