कामांमध्ये दिरंगाई केल्यास कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:53 PM2019-01-04T12:53:34+5:302019-01-04T12:53:40+5:30
नंदुरबार : बारा गाव पाणी योजनेचे भिजत घोंगडे लवकर दूर करा, यापूर्वी राबविलेल्या पाणी योजना बंद असतील किंवा त्यांचा ...
नंदुरबार : बारा गाव पाणी योजनेचे भिजत घोंगडे लवकर दूर करा, यापूर्वी राबविलेल्या पाणी योजना बंद असतील किंवा त्यांचा वापर होत नसेल तर त्या तातडीने सुरू होतील याकडे लक्ष द्यावे. या कामांमध्ये दुर्लक्ष किंवा दिरंगाई करणा:यांवर थेट कारवाई करण्याच्या सुचना आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी नंदुरबार तालुका पाणी टंचाई आढावा बैठकीत बोलतांना दिल्या.
यंदा जिल्ह्यात नंदुरबार तालुक्यातील सर्वाधिक गावे ही पाणी टंचाईच्या सावटाखाली आहेत. पूर्व भागातील सर्वाधिक गावांना तीव्र पाणी टंचाई आहे. येत्या काळात अर्थात जानेवारी ते मे दरम्यान या गावांना टंचाईच्या तीव्र समस्येला सामोरे जावे लागणार आहे. ही बाब लक्षात घेता टंचाईच्या कामांचा व उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी पंचायत समिती सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी तहसीलदार नितीन पाटील, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता पी.टी.बडगुजर, जलसंपदा विभागाचे डी.डी.जोशी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आमदार डॉ.गावीत यांनी सांगितले, यंदा अत्यल्प पजर्न्यमानामुळे मोठय़ा प्रमाणावर पाणी टंचाई आहे. नंदुरबार तालुक्यात दरवर्षी पूर्व भाग दुष्काळी असतो. यंदा तर तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात पाणी टंचाईची तीव्रता आहे. खरीप पिकाची उत्पादकता आधीच घटली, ते पीक वाया गेले. रब्बीचीही जेमतेमच आशा आहे. आता किमान पिण्यासाठी पाणी आणि जनावरांना चारा या दोन बाबींकडे गांभिर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
या दोन्ही कामांबाबत कुणी अधिकारी किंवा कर्मचा:याने दिरंगाई केल्यास कारवाई करावी. बारा गाव पाणी योजना सुरू होण्यात काय अडचणी आहेत. तांत्रिक अडचणी असतील तर त्या कशा सोडविल्या जातील याबाबत संबधीतांनी लक्ष घालावे.
भुगर्भातील पाणी पातळी खोल गेली आहे. कुपनलिका, विहिरी आटल्या आहेत. त्यामुळे पर्यायी उपाययोजना देखील स्थानिक पातळीवर होऊ शकणार नाहीत. अशावेळी तापीवरून पाईपलाईनने पाणी आणून अशा गावांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रय} करण्याचे निर्देश देखील आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी दिले.
आजच्या बैठकीत त्यांनी पूर्व व उत्तर भागातील 68 गावांचा आढावा घेतला. प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामसेवक व संबधीत अधिकारी यांच्याकडून त्या त्या गावांची टंचाईच्या परिस्थितीची माहिती घेतली. काय उपाययोजना करता येतील यासंदर्भात मार्गदर्शन केले.