योग्य भाव न दिल्यास पपई तोड बंद करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 01:07 PM2020-01-11T13:07:34+5:302020-01-11T13:08:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यात पपईची तोड सुरू आहे मात्र सुरूवातीच्या आणि सध्याच्या भावात मोठ्या प्रमाणावर तफावत आढळून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यात पपईची तोड सुरू आहे मात्र सुरूवातीच्या आणि सध्याच्या भावात मोठ्या प्रमाणावर तफावत आढळून येत आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याबाबत व्यापाऱ्यांमध्ये एकमत नाही. स्थानिक व्यापारी प्रती किलो ११ रूपये भाव देण्यास तयार असताना परराज्यातील व्यापारी मात्र नकारात्मक भूमिका घेत आहे. व्यापाºयांमध्ये समन्वय न झाल्यास शेतकºयांना पपई तोडबंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे पपई उत्पादक शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे.
तालुक्यात पपई काढणीला सुरूवात झाली असून व्यापाºयांकडून योग्य भाव देण्याबाबत एकमत नसल्याने शेतकºयांकडून नाराजी व्यक्त होत आहे. ऐन हंगामाच्या सुरूवातीला पपईला १७ रुपये प्रतीकिलो भाव देण्यात येत होता. मात्र महिन्याभराच्या आतच व्यापाºयांकडून सात रुपये भाव देण्यात येत असल्याने शेतकºयांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे पपईला ११ रूपये भाव देण्यात यावा, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे. तालुक्यात गेल्या काही वर्षापासून परराज्यातील व्यापारी पपई खरेदी करण्यासाठी शहादा तालुक्यात येतात. तालुक्यात दोन-चार नव्हे तर आता ८० ते ९० व्यापारी गटागटाने येतात. व्यापाºयांची संख्या मोठी असल्याने मनाला पटेल त्या भावाने ते पपई खरेदी करतात. याआधीही तालुक्यात पपईच्या दरावरुन आंदोलने झाली आहेत.
यंदा अतिवृष्टीमुळे पपईचे उत्पादन कमी आहे. त्यामुळे व्यापाºयांकडून सुरुवातीला प्रतीकिलो १७ रुपये भाव देण्यात आला. तालुक्यात एका दिवसाला ५० ते ५५ ट्रक पपई व्यापाºयांकडून खरेदी करून दिल्ली व उत्तर प्रदेशात निर्यात होते. सद्यस्थितीत पपईला प्रतीकिलो फक्त सात रूपये भाव देण्यात येत असल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त करीत पपईची तोड करण्यास नकार दिला आहे. स्थानिक व्यापारी ११ रुपये भाव देत असताना बाहेरील व्यापाºयांनी सात रुपयांपेक्षा जास्त भाव मिळणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. व्यापाºयांच्या दराबाबत सुरू असलेल्या चढाओढीमुळे शेतकºयांपुढे पेच निर्माण झाला आहे. स्थानिक व बाहेरील व्यापाºयांनी पपईच्या दराबाबत शेतकºयांना परवडेल असा योग्य निर्णय घेऊन शेतकरी व व्यापाºयांमधील संभाव्य संघर्ष टाळावा, अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त होत आहे. पपई उत्पादक शेतकºयांनी योग्य भाव न मिळाल्यास पपईची तोड बंद करण्याची भूमिका घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनानेही याकडे लक्ष घालून पपईच्या दराबाबत योग्य तोडगा काढण्याची गरज आहे.
४शेतमालाला योग्य भाव मिळावा एवढीच अपेक्षा शेतकºयांची असते. मात्र व्यापारी त्यांच्या सोयीनुसार भाव ठरवत असल्याने शेतकरी योग्य भाव मिळण्यापासून वंचित राहतो. त्यातच मजुरी, चहा-पाणी, नाश्ता आदी खर्च व इतर किरकोळ खर्च हा शेतकºयांकडून वसूल होतो. व्यापाºयांकडून देण्यात येणाºया दराच्या चढ-उतारामुळे शेतकºयांना बºयाचवेळेस नुकसानीला सामोरे जावे लागते. तसेच काही व्यापाºयांना आधी माल दिल्यामुळे अनेक व्यापारी पैसे नंतर देऊ, असे आश्वासन देऊन रफूचक्कर होत असल्याने शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. व्यापारी पसार होऊन शेतकºयांचे पैसे बुडाल्याच्या घटना तालुक्यात बºयाचवेळा घडल्या आहेत.