बेशिस्ती दाखवाल तर लगेच होईल दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 12:46 PM2020-09-30T12:46:18+5:302020-09-30T12:46:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने केलेल्या सूचना न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. ...

If you show disobedience, you will be punished immediately | बेशिस्ती दाखवाल तर लगेच होईल दंड

बेशिस्ती दाखवाल तर लगेच होईल दंड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने केलेल्या सूचना न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत़ बेशिस्ती दाखवणाºया नागरिकांना रोख स्वरूपात दंड होणार असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे़
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता तात्काळ नियंत्रण व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना सुरू आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता अधिक आहे़ संसर्ग रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर जाणाºया प्रत्येक नागरिकाने चेहºयावर मास्क परिधान करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी शारीरिक अंतराच्या सुचनेचे पालन करणे आवश्यक आहे. परंतू जिल्ह्यात बºयाच ठिकाणी नागरीक सूचनांचे पालन करतांना आढळून येत नसल्याचे चित्र आहे़ त्यामुळे प्रशासनाने दंडात्मक कारवाईचे आदेश यापूर्वी दिले होते. मात्र नागरिक त्यास दाद देत नसल्याने प्रशासनाने सुधारीत आदेश काढले आहेत़ यातून दंडाच्या रकमेत सुधारणा केली गेली आहे. एखादी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी थुंकताना प्रथम आढळल्यास २०० रूपये दंड होईल़ दुसऱ्यांदा थुंकल्यास ४०० तर तिसºयांदा थुंकल्यास ४०० रूपये दंड आणि फौजदारी कारवाई होणार आहे़ नागरिकांनी मास्क, रुमाल न वापरल्यास प्रथम २०० रूपये दंड केला जाईल़ दुसºयांदा ४०० तर तिसºयांदा आढळल्यास ४०० रूपये दंड आणि फौजदारी कारवाई होणार आहे़

सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग न केल्यास प्रथम २०० रूपये दंड होणार आहे़ दुकानमालक, किरकोळ विक्रेते यांना ही दंडाची रक्कम प्रतीग्राहकाप्रमाणे द्यावी लागणार आहे़ दुसºयांदा ४०० आणि तिसºयांदा ४०० रूपये आणि फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे़ आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी नगरपालिका, पोलीस आणि महसूल कर्मचारी यांना सूचित करुन पथकांची नियुक्ती झाली आहे़ या पथकांकडून शहरी व ग्रामीण भागात कारवाई सुरू होणार आहे़

Web Title: If you show disobedience, you will be punished immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.