मोदीसाहेब मिठाई हवी असेल तर नंदुरबारला या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:59 PM2018-10-20T12:59:03+5:302018-10-20T12:59:03+5:30
नंदुरबार : दिवाळीच्या दिवसात नवीन घर मिळाले आहे, मित्र परिवार आणि नातेवाईकांना मिठाई वाटली मग़़ माझंही तोंड गोड करा़़ ...
नंदुरबार : दिवाळीच्या दिवसात नवीन घर मिळाले आहे, मित्र परिवार आणि नातेवाईकांना मिठाई वाटली मग़़ माझंही तोंड गोड करा़़ ! या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या दिलखुलास संवादातून आनंदाने गद्गद् झालेल्या सातपुडय़ातील सिंगा वसावे या घरकुल लाभार्थीने ‘मोदी साहेब मिठाई पाहिजे असेल तर नंदुरबारला या़!’ असे उत्तर देत प्रधानमंत्र्यांना आमंत्रण दिल़े शिर्डी येथील ई-गृहप्रवेश कार्यक्रमप्रसंगी व्हिडिओ कॉन्स्फरन्सिंगच्या माध्यमातून हा संवाद घडून आला़
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हिडिओ कॉन्स्फरन्स हॉलमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील सात लाभार्थीसोबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्स्फरन्सद्वारे संवाद साधत त्यांच्या घरकुलाबद्दलच्या प्रतिक्रिया जाणून घेत त्यांना ई-गृहप्रवेश करून दिला़ शिर्डी येथून राज्याच्या विविध भागातील घरकुल लाभार्थीसोबत प्रधानमंत्री मोदी चर्चा करत होत़े जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून नंदुरबार जिल्ह्यातील सात लाभार्थी यावेळी व्हीसीद्वारे प्रधानमंत्री मोदी यांच्यासोबत संपर्कात होत़े प्रसंगी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे हे लाभार्थीसह उपस्थित होत़े सकाळी 10 वाजेपासून या उपक्रमास प्रारंभ झाला होता़
प्रशासनाला चार दिवसांपूर्वी ई-गृहप्रवेश उपक्रमासाठी चार घरकुल लाभार्थीची निवड करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या़ यानुसार त्यांनी प्रारंभी भगदरी ता़ अक्कलकुवा येथील सिंगा सेगा वसावे, सायसिंग नूरज्या वसावे, वाटवी ता़ नवापूर येथील जयवंती मोतीलाल कोकणी, बिजगाव येथील श्रावण निंबा सोनवणे या चौघांची निवड केली होती़ परंतू काही कारणास्तव गुरुवारी यात नंदुरबार तालुक्यातील वाघशेपा गावाची निवड करून तेथील चार लाभार्थीना ऐनवेळी आमंत्रित करण्यात आल़े तर वाटवी येथील ग्रामपंचायत कार्यालयातच जयवंती कोकणी यांची व्यवस्था करण्यात आली़ हा संवाद सुरु झाल्यानंतर वाटवी ग्रामपंचायत ऑनलाईनच न आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असलेले सिंगा सेगा वसावे, सायसिंग वसावे दोघे रा़ भगदरी ता़ अक्कलकुवा, वाघशेपा ता़ नंदुरबार येथील अहिल्याबाई अशोक पाडवी, मंजूळाबाई संदेश पाडवी, जयवंतीबाई छगन गावीत, शेवंतीबाई दिवाण पाडवी, नलिनीबाई दिवाणजी गावीत यांच्यासोबत प्रधानमंत्र्यांनी संवाद साधला़
या संवादादरम्यान उपस्थित लाभार्थीसोबत संपर्क करणा:या प्रधानमंत्री मोदी यांनी तिघा लाभार्थीची कौटूंबिक पाश्र्वभूमी जाणून घेत मुलींना शिकवता की, नाही अशीही विचारणा केली़ संवाद सुरु असताना सिंगा वसावे यांच्या आमंत्रणाला उत्तर देणा:या प्रधानमंत्री मोदी यांनी पुन्हा नंदुरबारच्या चौधरींच्या चायची आठवण काढत, नंदुरबार हा गुजरातचा पक्का शेजारी असल्याने येथेही गुजराती संस्कृती रूजली असल्याची भावना व्यक्त केली़