मंडळ स्तरावर लावलेल्या पजर्न्यमापकांकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 11:52 AM2019-06-01T11:52:12+5:302019-06-01T11:52:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी व त्या अनुषंगाने पीक व्यवस्थापनासाठी जिल्ह्यात प्रत्येक मंडळ स्तरावर स्वयंचलित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी व त्या अनुषंगाने पीक व्यवस्थापनासाठी जिल्ह्यात प्रत्येक मंडळ स्तरावर स्वयंचलित पजर्न्यमापक व इतर उपकरणे बसविण्यात आली आहेत. पावसाळ्यापूर्वी या उपकरणांची देखभाल व दुरूस्ती होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात 36 मंडळ स्तरावर त्यांची उभारणी करण्यात आली असली तरी बहुतेक ठिकाणी केवळ पजर्न्यमापकच बसविण्यात आले आहे.
हवामान आधारीत फळपीक तसेच इतर पिकांचे नियोजन करण्याचे धोरण शासनाने तीन वर्षापासून राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीत होणारे नुकसान टाळणे, तसे नुकसान झाल्यास त्या भागातील हवामान त्या काळात कसे होते त्याची माहिती घेणे यासह शेतक:यांना हवामानाची पूर्वसुचना देणे हा उद्देश त्यामागे आहे. त्याअंतर्गतच मंडळ स्तरावर वेधशाळा उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु ते यशस्वी झाले नाही. 36 मंडळ स्तराची त्याकरीता निवड देखील करण्यात आली होती.
केवळ पजर्न्यमापक
मिनी वेधशाळा स्वरूपात त्यांची उभारणी करण्यात येणार होती. अशा ठिकाणी हवेचा वेग, हवेची दिशा, वातावरणातील आद्रता, पावसाचे प्रमाण, तापमान यासह इतर बाबींची माहिती संकलीत होणार होती. ही सर्व उपकरणे संगणकाद्वारे उपग्रहाशी जोडली जावून ऑनलाईन डाटा हा महावेध या शासनाच्या अधिकृत केंद्रात संकलीत करण्याच्याही सुचना होत्या. त्यासंदर्भात कृषी विभागाने अध्यादेश काढून सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना सुचीत केले होते. यामुळे कुठल्या भागात वादळ होते, पाऊस किती झाला, तापमान किती राहिले, आद्रतेचे प्रमाण कसे होते, वादळ किंवा अवकाळी पावसाची शक्यता आहे काय? याची माहिती लागलीच मिळण्यास मदत होणार होती. याशिवाय मिळणा:या आकडेवारीवरून पूर्व अनुमान देखील काढण्याचे प्रस्तावीत होते. परंतु अशा ठिकाणी केवळ पजर्न्यमापक बसविण्यात आले आहेत. त्यामुळे केवळ पावसाळ्याचे चार महिने पजर्न्यमानाची आकडेवारी मिळते.
चार ठिकाणी सुरू
सध्या चार ठिकाणी अशा प्रकारची उपकरणे कार्यान्वीत आहेत. त्यात नंदुरबार, नवापूर, तोरणमाळ आणि शहादा या ठिकाणांचा समावेश आहे. आता पुन्हा नव्याने 36 ठिकाणी झाल्यावर जिल्ह्यात एकुण 40 ठिकाणी ही सोय होणार आहे. हवामानाच्या माहितीसाठी उभारण्यात आलेल्या या चार ठिकाणी या उपकरणांना विजेची गरज नाही. उपकरणांना जोडलेल्या सौर बॅटरीद्वारे तेथे उर्जा निर्माण केली जाते. त्याद्वारेच उपकरणांमधील डाटा पाठविला जातो. त्यामुळे दुर्गम भागात देखील या उपकरणांकरीता विजेविना काही समस्या उद्भत नाही.
नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतक:यांना शासन आता कुठलेही अनुदान देत नाही. केवळ पीक विम्याद्वारे ती नुकसान भरपाई भरून मिळणार आहे. त्यामुळे विमा कंपनीकडून नुकसान भरपाई योग्य आणि पुरेशी मिळावी याकरीता या वेधशाळा उपकरणांकडून मिळणा:या अहवालाचाही उपयोग करण्यात येत आहे. या अहवालाद्वारेच त्या त्या भागातील पीक विमा मंजुर केला जात असतो.