महामार्ग कामात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष : शहादा ते खेतिया रस्ता रुंदीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:23 PM2018-03-28T12:23:45+5:302018-03-28T12:23:45+5:30
युवकाच्या मृत्यूनंतरही अधिकारी व ठेकेदाराची डोळेझाक
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 28 : कोळदा ते खेतिया महामार्गाचे ठिकठिकाणी रुंदीकरणाचे काम सुरू आहे. शहादा ते खेतिया दरम्यान होणा:या या कामाच्या ठिकाणी वाहनांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना नसल्याने वाहनधारकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. दरा फाटय़ाजवळ झालेल्या अपघातात युवकाच्या झालेल्या मृत्यूनंतरही संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी उपाययोजना न केल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
कोळदा ते खेतिया महामार्गाच्या रुंदीकरण कामाचा शुभारंभ झाल्यानंतर महामार्गासाठी लागणा:या जमिनीची भूसंपादन प्रकियाही शासनाने पूर्ण केली आहे. शहादा तालुक्यातील लोणखेडा, ब्राrाणपुरी, रायखेड, खेडदिगर याठिकाणी महामार्ग रुंदीकरणाला सुरुवात झाली आहे. सध्या प्राथमिक स्तरावर मार्गावरील ठिकठिकाणी छोटय़ा पुलाचे काम, जमिनीचे सपाटीकरण, आवश्यक ठिकाणी भर टाकणे, झाडे तोडणे अशी कामे सध्या सुरू आहेत. महामार्गाचे काम वेगात सुरू आहे ही समाधानाची गोष्ट आहे. मात्र रुंदीकरणाचे काम सुरू असताना जुन्या महामार्गावर वाहतूक मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना काम करणारे ठेकेदार किंवा महामार्गाचे काम करणा:या अधिका:यांनी केलेली दिसत नाही. तसेच महामार्गाच्या सपाटीकरणासाठी मातीने ने-आण करणा:या डंपरमधून मोठय़ा प्रमाणात माती बाहेर उडते. इतर वाहनचालकांसह पादचा:यांना त्यामुळे धोका निर्माण होत आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे, न दिसणारा रस्त्याचा कडा व वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी न केलेल्या उपाययोजना यामुळे शहादा तालुक्यातील पिंगाणे येथील युवकाला आपला जीव गमवावा लागला. काही ठिकाणी झालेले सपाटीकरण तर काही ठिकाणी खोदण्यात आलेले खड्डे, चर यामुळे जुन्या महामार्गाची कडा रात्रीच्यावेळी बरोबर दिसत नाही. महामार्गाचा कडा वाहन चालकाला दिसाव्यात म्हणून लावण्यात आलेल्या मातीच्या गोण्या, रिफ्लेक्टर रात्रीच्या वेळी वाहन चालकांना दिसत नाही. त्यामुळे महामार्ग कुठे संपतो हे दिसत नाही. ही कडा योग्य पध्दतीने दिसावी तसेच येथून जाणा:या वाहनांचा सुरक्षित प्रवास घडावा यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी ठेकेदाराबरोबर प्रशासनाचे अधिकारी उदासीन दिसत असून प्रभावी उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.