गुजरातकडे जाणारी अवैध दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 11:51 AM2019-10-06T11:51:23+5:302019-10-06T11:51:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापूर शहरातुन एका वाहनातुन गुजराथ कडे होत असलेली अवैद्य विदेशी दारुची चोरटी वाहतुक नवापूर ...

Illegal liquor seized in Gujarat | गुजरातकडे जाणारी अवैध दारू जप्त

गुजरातकडे जाणारी अवैध दारू जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापूर शहरातुन एका वाहनातुन गुजराथ कडे होत असलेली अवैद्य विदेशी दारुची चोरटी वाहतुक नवापूर पोलीसानी हाणून पाडली. चार लक्ष 86 हजाराचा मुद्देमाल सह दोन जणांना पोलीसानी ताब्यात घेतले आहे. 
नंदुरबार, नवापूर मार्गाने गुजराथ कडे अवैद्य विदेशी दारुची चोरटी वाहतुक होत असल्याची गोपनीय माहीती नवापूरचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना मिळताच सहायक पोलीस निरीक्षक धिरज महाजन, पोलीस नाईक योगेश थोरात, प्रविन मोरे, योगेश साळवे, जयेश बाविस्कर यांना याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी महामार्गावर शांतीदुत पोलिस चौकी येथे संशयीत वाहन इशारा करुन थांबवली व वाहनाची पंचांसमक्ष तपासणी केली. मिळालेल्या माहितीची खात्री झाल्यावर ते वाहन पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने नवापूर पोलिस स्टेशन येथे आणण्यात आले. तेथे पंचांसमक्ष वाहनातून मुद्देमाल खाली उतरुन मोजनी केली असता 50 खोके इम्पेरियल ब्लू कंपनीची तीन लाख 36 हजार किमतीची विदेशी दारु व तवेरा कंपनीचे दीड लाख किंमतीचे वाहन असा एकूण चार लाख 86 हजार रु. चा माल जप्त करण्यात आला आहे. संशयीत आरोपी किशोर बारकु  पाटील, (30) रा.भडगोन (मध्यप्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले. त्याला हा माल  कोठुन आणला? कसा काय आणला?  बाबत अधिक चौकशीत शिरपुर तालुक्यातील बोराडी गावातील अजय पवार यांचेकडुन हा माल घेतला असल्याची माहीती दिली.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलिस अधिक्षक चंद्रकात गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी केलेली असुन सदरबाबत दाखल गुन्ह्याचा तपास सहा. पोलीस निरीक्षक धिरज महाजन करीत आहे.

4 पोलीस उप निरीक्षक नासीर पठाण, हवालदार जयेश बावीस्कर, योगेश साळवे यांना बोराडी गावी  पाठवुन सकाळी संशयेत आरोपी हा झोपेतच असतांना त्याला त्याचे गावातुन ताब्यात घेवुन पो.स्टे. ला आणण्यात आले. गुन्ह्यातील जप्त मालाच्या मुळ मालकापयर्ंत पोहचण्यास नवापुर पोलीसांना यश आले आहे. सध्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंघाने राज्यात आचार संहीता सुरु असुन जागोजागी पथक तत्पर असुनसुद्धा अवैद्य दारु शिरपुर, शिंदखेडा, दोंडाईचा, नंदुरबार, विसरवाडी मार्गे नवापुर कशी पोहोचते याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
 

Web Title: Illegal liquor seized in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.