अवैधरित्या वाळू वाहतूक करणा:या वाहनांची धरपकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 11:24 AM2019-10-03T11:24:04+5:302019-10-03T11:24:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्याच्या विविध भागातून राज्याच्या विविध भागात अवैधरित्या वाळूची वाहतूक करणा:या वाहनांची तपासणी मोहिम प्रादेशिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्याच्या विविध भागातून राज्याच्या विविध भागात अवैधरित्या वाळूची वाहतूक करणा:या वाहनांची तपासणी मोहिम प्रादेशिक परिवहन विभागाने मंगळवारी रात्री सुरु केली़ यांतर्गत 45 वाहनांची तपासणी करण्यात येऊन दोषी वाहनधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला़
जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी वाळू वाहतूक करणा:या वाहनांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ या मोहिमेसाठी प्रादेशिक परिवहन विभागाचे प्रत्येकी दोन निरीक्षकांचे भरारी पथक नियुक्त करण्यात आले आह़े या पथकांनी मंगळवारी रात्री उपप्रादेशिक परिवहन जिल्ह्यासह नंदुरबार तालुक्याच्या विविध भागातून नाशिक जिल्ह्याकडे जाणा:या अवजड वाहनांची तपासणी सुरु केली होती़ यात 45 वाहनांची तपासणी करण्यात आली आह़े यात 12 वाहनांची कागदपत्रे नसल्याने तसेच अवैध वाळू आढळून आल्याने जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े विधानसभा निवडणूक काळातही मोहिम सुरु राहणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने दिली आह़े
मोहिमेदरम्यान मंगळवारी रात्री उशिरा नंदुरबार शहरातील वळणरस्त्यावर तपासणी सुरु असताना एमएच 43 वाय 9909 या अजवड वाहनात 38 हजार 370 किलोग्रॅम वाळू अवैधपणे भरल्याचे दिसून आल़े या वाहनाची क्षमता ही 35 हजार किलो ग्रॅम असताना त्यात 3 हजार 370 किलो जादा वाळू दिसून आल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात वाहनमालक निवृत्ती नारायण झाडे रा़ चिंचोली ता़ सिन्नर व शरद भानुदास पांगरकर रा़ पांगरी ता़ सिन्नर जि़नाशिक या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़ प्रादेशिक परिवहन विभागाच्या प्रिव्हेंशन ऑफ डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी अॅक्ट 1984 च्या कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े गेल्या सहा महिन्यात या कायद्यांतर्गत जिल्ह्यात पाचवा गुन्हा दाखल झाल्याची माहिती आह़े