शहाणा येथे अवैध स्पिरीट जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 01:04 PM2020-11-29T13:04:09+5:302020-11-29T13:04:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील शहाणा येथील शेतात धाड टाकून पोलिसांनी स्पिरीटसह एकुण ५७ हजार ५०० रुपये किंमतीचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील शहाणा येथील शेतात धाड टाकून पोलिसांनी स्पिरीटसह एकुण ५७ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, मध्यप्रदेशातून आडमार्गाने दारू, स्पिरीट, गुटखा, गांजा यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून होणा-या कारवाईत हे स्पष्ट होत आहे.
तेनसिंग उर्फ तेरसिंग शंकर पावरा रा बोरपाणी ता.शिरपुर जि.धुळे असे संशयीताचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, २६ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शहाणा गावातील जंगलात गोपाल बिरबल पावरा यांचे शेताच्या बाजुला निंबाच्या झाडाखाली बेकायदेशीररित्या साठवलेले स्पिरीट जप्त केले आहे. त्यात २५ हजार रुपये किंमतीचा एक निळ्या रंगाचा ड्रम त्यात१०० लिटर स्पिरीट , दहा हजार रुपये किंमतीचा एक सफेद साचा, प्लॉस्टीकची कॅन त्यात ४० लिटर स्पिरीट, २२ हजार ५०० रुपये किंमतीच्या तीन प्लास्टीकच्या गोण्या त्यात एक एक लिटरच्या स्पिरीटने भलरेल्या अश्या एकुण ९० पिशव्या असा एकुण ५७हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी शहादा पोलिसात अमृत विनायक पाटील यांच्या फिर्यादीवरून तेनसिंग उर्फ तेरसिंग शंकर पावरा रा बोरपाणी ता.शिरपुर जि.धुळे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ दिपक परदेशी करत आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू, गुटखा, गांजा यांची तस्करी होत आहे. मध्यप्रदेशातून शहाणा, मंदाणा मार्गे शहादा व गुजरातमध्ये वाहतूक केली जात आहे. त्यामुळे मध्यप्रदेशाच्या सिमेवर विशेषत: ग्रामिण भागातील रस्त्यावर चेकनाके तयार करावे अशी मागणी होत आहे.