दारूची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले
By admin | Published: June 8, 2017 04:04 PM2017-06-08T16:04:25+5:302017-06-08T16:04:25+5:30
चालक फरार : चोर समजून शेतक:यांनी केला पाठलाग
Next
ऑनलाईन लोकमत
म्हसावद,दि.8- शहादा तालुक्यातील म्हसावद परिसरातून 4 जून रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास शेतक:यांनी चोर समजून एका वाहनाचा पाठलाग केला. मात्र त्यात अवैध दारूचा साठा आढळून आला.
रविवारी शेतक:यांच्या शेतातून रात्रीच्या वेळेस सबमर्सबिल वायर चोरणारी टोळी आली असल्याचा संशय शेतक:यांना आला. त्यामुळे त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे एकमेकांना बोलावून जमा होवून, याबाबत पोलीस ठाण्यातही फोन केला. मात्र पोलीस येत नसल्याने त्यांनी एकत्र येत वाहनाच्या दिशेने धाव घेतली असता वाहन चालकासह इतरांनी पळ काढला.
या वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यात अवैध दारूचे खोके आढळून आले. म्हसावदला 2 जूनला दोन ठिकाणी झालेली घरफोडी, रात्री 11 वाजता अवैध दारूची वाहतूक यामुळे परिसरात गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र आहे. 4 जून रोजी रात्री शेतकरी शेतांमध्ये असताना एक पीकअप वाहन रस्त्याच्या कडेला उभे असल्याचे आढळून आले. सबमर्सिबल वायर चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरून शेतकरी जमा झाले. भ्रमणध्वनीवरून पोलिसांना कळविण्यात आले. मात्र पोलीस आलेच नाही.