अनैतिक संबंध ठेवणा:या पतीविरुद्ध गुन्हा
By admin | Published: February 28, 2017 11:41 PM2017-02-28T23:41:18+5:302017-02-28T23:41:18+5:30
गुजरात राज्यात सासर : नंदुरबारचे माहेर असलेल्या महिलेची आपबिती
नंदुरबार : पहिली पत्नी हयात असताना दुस:या महिलेसोबत संबंध ठेवणा:या पतीला समजावूनही त्याने न ऐकल्याने संतप्त झालेल्या पत्नीने पतीविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद देत गुन्हा दाखल केला आह़े या महिलेचे माहेर नंदुरबार शहरातील आह़े
नंदुरबार शहरातील दुधाळे रस्त्यावरील मतीमंद शाळेजवळील माहेर असलेल्या प्रतिभा देवानंद साळवे यांचा विवाह 2009 मध्ये देवानंद वसंत साळवे रा़ वेलदा ता़ निझर जि़ तापी गुजरात यांच्यासोबत झाला होता़ लगAाच्या तीन वर्षानतर प्रतिभा साळवे यांचे पती देवानंद साळवे याचे वेलदा गावातीलच एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती त्यांना मिळाली होती़ या माहितीनंतर संतप्त झालेल्या प्रतिभा यांनी पती देवानंद यास समज देण्याचा प्रयत्न केला़ मात्र देवानंद हा ऐकून घेण्यास राजी नव्हता़ हा प्रकार संबंधित महिलेने सासरच्यांच्या कानावर घालूनही प्रकार सुरूच होता़ प्रतिभा यांच्या या विरोधाला मोडून काढण्यासाठी पती देवानंद, सासरचे लोक व संबंधित महिला यांच्याकडून शारीरिक व मानसिक छळ सुरू होता़ वेळावेळी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी सासरच्यांकडून दिली जात असल्याने प्रतिभा यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणे गाठत पतीसह सासरची माणसे आणि संबंधित महिलेविरोधात फिर्याद दिली़ याप्रकरणी सोमवारी उशिरा शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला़
विवाहिता प्रतिभा साळवे यांच्या फिर्यादीनुसार पती देवानंद वसंत साळवे, सासरे वसंत शंकर साळवे, सासू सुमनबाई वसंत साळवे, जेठ देवेंद्र साळवे, जेठाणी सविता देवेंद्र साळवे, नणंद दीपमाला सिद्धार्थ महिरे, नंदोई सिद्धार्थ भाईदास महिरे व जयश्री विजय गोसावी या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस सहायक उपनिरीक्षक गंगाराम जिरे करत आहेत़
पोलिसांकडून दोघांचा शोध सुरू
4या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून संबंधित पती व ‘त्या’ महिलेचा शोध घेतला जात असल्याची माहिती देण्यात आली आह़े
42012 ते फेब्रुवारी 2017 र्पयत विवाहिता प्रतिभा यांचा छळ करण्यात आल्याचे पोलीस फिर्यादित म्हटले आह़े