जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी नंदुरबारात शिक्षकांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:24 PM2018-02-05T12:24:03+5:302018-02-05T12:24:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या राज्यातील शिक्षकांसह सर्वच कर्मचा:यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आली आह़े
याबाबत जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलशेट्टी यांना निवेदन देण्यात आले आह़े यात म्हटल्या प्रमाणे, सध्या राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत दाखल झालेल्या सर्व कर्मचा:यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू आह़े पण यानंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांसह सर्व कर्मचा:यांना नवीन परिभाषित अंशदायी (डीसीपीएस) योजना सुरु आह़े त्यामुळे शिक्षकांसह सर्व कर्मचा:यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी आह़े अंशदायी पेन्शन योजनेतही अनेक अनियमितता असल्याचा आरोप करण्यात आला आह़े अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आल़े निवेदनावर संघाचे जिल्हा सरचिटणीस संजय बागूल, कोषाध्यक्ष किशोर ठाकरे, जिल्हाध्यक्ष हंसराज पाटील, सतिश पाटल, राज्यअध्यक्ष किशोर पाटील यांच्या स्वाक्ष:या आह़े