नंदुरबारातील प्रस्तावांवर कार्यवाही व्हावी : 232 विहिरींचे कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:58 PM2018-01-31T12:58:10+5:302018-01-31T13:00:00+5:30

To implement the proposals of Nandurbar: Complete works of 232 wells | नंदुरबारातील प्रस्तावांवर कार्यवाही व्हावी : 232 विहिरींचे कामे पूर्ण

नंदुरबारातील प्रस्तावांवर कार्यवाही व्हावी : 232 विहिरींचे कामे पूर्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अहिल्यादेवी सिंचन विहिर योजनेचे अनेक प्रस्ताव कार्यवाही अभावी कार्यालयातच पडून असल्याची स्थिती आह़े विहिरींच्या उद्दीष्टपूर्तीनंतर लाभाथ्र्याचे प्रस्ताव विचारात घेऊ नयेत असे आदेश गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आह़े त्यामुळे नंतर आलेल्या प्रस्तावांचा वाली कोण? असा प्रश्न आता विचारण्यात येत आह़े 
अहिल्यादेवी सिंचन विहिर योजनेची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात येत असतात़ त्यासाठी 2016-2017 व 2017-2018 साठी 2 हजार 500 विहिरींचे उद्दीष्ट देण्यात आलेले होत़े जिल्ह्यातून एकूण 2 हजार 988 लाभाथ्र्यानी प्रस्ताव सादर केले आहेत़ या पैकी, 2 हजार 176 विहिरींची कामे प्रगतीपथावर आहेत तर, 232 विहिरींची कामे पूर्ण झाले असल्याचे  सांगण्यात आल़े 
अनेक प्रस्ताव पडून.
अनेक लाभाथ्र्याचे प्रस्ताव पंचायत समितीतच पडून असल्याचे सांगण्यात आले आह़े त्यामुळे लाभाथ्र्याकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े उद्दीष्टपूर्तीनंतर आलेल्या प्रस्तावांवर कार्यवाही न करण्याचे पत्र गटविकास अधिकारी यांना पाठविण्यात आले आह़े तसेच गरज असल्यास हे प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडेच पाठवावे असादेखील उल्लेख या पत्रात करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आह़े दरम्यान, हे उर्वरीत प्रस्ताव पुढील आर्थिक वर्षात वर्ग करण्यात येतील असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आह़े प्रत्येक लाभाथ्र्याला 2 लाख 90 हजार रुपयांचे अनुदान एका विहिरीसाठी देण्यात येत असत़े हे अनुदान लाभार्थी शेतक:याच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येत असत़े अनेक वेळा निधीचे वितरण होण्यासही विलंब होत असल्याचे सांगण्यात येत आह़े 
 

Web Title: To implement the proposals of Nandurbar: Complete works of 232 wells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.