आरोग्य, शिक्षणासह पाणी योजनांना दिले महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 12:05 PM2018-10-25T12:05:09+5:302018-10-25T12:05:14+5:30

नंदुरबार : आरोग्य, शिक्षण आणि  पिण्याचे पाणी याला आपण आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत सर्वाधिक महत्त्व दिले. यामुळे गेल्या अडीच वर्षात ...

The importance given to water schemes with health, education | आरोग्य, शिक्षणासह पाणी योजनांना दिले महत्त्व

आरोग्य, शिक्षणासह पाणी योजनांना दिले महत्त्व

Next

नंदुरबार : आरोग्य, शिक्षण आणि  पिण्याचे पाणी याला आपण आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत सर्वाधिक महत्त्व दिले. यामुळे गेल्या अडीच वर्षात या विभागाअंर्गत सर्वाधिक कामे झाली. तळागाळातील लोकांर्पयत योजनांच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्याचा देखील प्रय} राहिल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांनी ‘लोकमत’ संवाद उपक्रमात बोलतांना दिली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रजनी शिरिषकुमार नाईक यांनी बुधवारी ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. कार्यालय प्रमुख रमाकांत पाटील, मनोज शेलार उपस्थित होते. आपल्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीबाबत त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. गरीब, सर्वसामान्य आणि मागास लोकांच्या जनकल्याणाच्या योजना राबवितांना आणि त्यांचे लाभ त्यांच्यार्पयत पोहचतांना आनंद होतो. आपल्या कारकिर्दीत कुठलाही भेदभाव न ठेवता सर्व योजनांचा लाभ सर्वाना कसा मिळेल याचा प्रय} राहिला. आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी याला सर्वोच्च प्राधान्य दिले. महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांचा विकास व्हावा यासाठी त्या विभागाच्या योजना त्यांच्यार्पयत पोहचण्यासाठी विशेष प्रय} राहिल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षणाला प्राधान्य
जिल्ह्यातील मुलांना जिल्हा परिषदेमार्फत चांगले व दज्रेदार शिक्षण मिळावे यासाठी विविध योजना आणि उपक्रम हात घेण्यात आले. 1390 जिल्हा परिषद शाळांपैकी 1002 शाळा डिजीटल करण्यात आल्या आहेत. त्याची टक्केवारी 72 इतकी आहे. सर्वच शाळा या ज्ञानरचनावादी झालेल्या आहेत. शाळा सिद्धी कार्यक्रमाअंतर्गत 200 जि.प.शाळा अ श्रेणीत आलेल्या आहेत. शासनाच्या केआरए अंतर्गत 1234 जि.प.शाळांपैकी 951 शाळा या प्रगत झालेल्या आहेत. लोकसहभागातून तब्बल 94 लाख 69 हजार 605 रुपये जमा करण्यात आले होते.
आरोग्य सेवा बळकट
जिल्ह्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी विशेष प्रय} करण्यात आले. रोषमाळ, ता.धडगाव, पुरुषोत्तमनगर, ता.शहादा येथे आरोग्य केंद्र, बारी, ता.नवापूर, निंबवेल, ता.नंदुरबार, काकडदा, ता.शहादा येथे उपकेंद्र बांधकाम, म्हसावद ग्रमिण रुग्णालयात रक्त साठवण कक्ष, अक्कलकुवा येथे नवजात शिशू दक्षता कक्ष, नागरी अभियानाअंतर्गत नंदुरबार पालिकाअंतर्गत दोन तर शहादा पालिकेअंतर्गत एक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम, जिल्हा रुग्णालयात डे केअर युनिट व डीईआयसी कक्ष दुरूस्त व नुतनीकरण, आरोग्य कर्मचारी निवासस्थाने बांधकाम पुर्ण करण्यात आले. संस्थाअंतर्गत प्रसुतीवर भर देण्यात आला. गरोदर व प्रसुत मातांना योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात आले. कुपोषणाचे प्रमाण कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.
पिण्याचे पाणी
भौगोलिक परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याच्या योजना राबवितांना कसरत होते. असे असले तरी विंधन विहिरींना प्राधान्य देत जास्तीत जास्त गावे व पाडय़ांवर त्या करण्यात आल्या. सौर दुहेरीपंप योजनेअंतर्गत 154 सौर पंप मंजुर करण्यात आले. त्यासाठी एकुण चार कोटी 69 लाख रुपये खर्च येणार आहे.
महिला सक्षमीकरण
महिला सक्षमीकरणाअंभर्गत बचत गटांना प्राधान्य देण्यात आले. त्यांना मोठय़ा प्रमाणावर निधी वितरीत करण्यात आला. तीन वर्षात साडेसहा हजारापेक्षा अधीक स्वयंसहायता बचत गट स्थापन करून त्यांना खेळते भांडवल, कर्ज वाटप, प्रशिक्षण दिले. बचत गट ऑनलाईन करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत.
याशिवाय पशुसंवर्धन, कृषी, समाजकल्याण, ग्रामपंचायत, बांधकाम या विभागाअंतर्गत देखील विविध योजनांच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर निधी खर्च करण्यात आला.
शासनाचे सहकार्य
राज्यात भाजपचे शासन व जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात असली तरी निधी किंवा इतर कामांबाबत फारशा अडचणी येत नाहीत. माजी मंत्री आमदार सुरुपसिंग नाईक व इतर वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन आणि त्यांच्या माध्यमातून योजनांना गती मिळते.  सर्व पदाधिकारी आणि अधिकारी यांचे देखील सहकार्य मिळते. यामुळे कारभार सांभाळतांना फारशा अडचणी येत नाहीत.परिणामी ग्रामिण भागाचा विकासाच्या योजना राबवितांना समाधान मिळत असल्याचेही रजनी नाईक यांनी सांगितले.जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पदभार स्विकारल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच आपण लोकांच्या हक्काच्या योजना लोकांर्पयत पोहचविण्याचे काम सुरू केले. यापूर्वी पंचायत समिती सदस्यपदाचा अनुभव असल्याने शिवाय ज्येष्ठ नेते सुरपसिंग नाईक, माणिकराव गावीत, आदिवासी साखर कारखान्याचे अध्यक्ष शिरीष नाईक शिवाय आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाल्याने अडीच वर्षाच्या काळात आपण समाधानकारक काम करू शकलो. आरोग्य, शिक्षण, पाणी, कुपोषणाचे प्रश्न सोडविण्यासाठी काही कठोर निर्णय घेतले. दुर्गम भाग पिंजून काढला. त्यामुळे लोकांचे प्रश्न समजले व ते सोडविण्यासाठी कामही करता आले. खरेतर शेवटचे अडीच वर्षाचा काळ आपल्याला मिळाला. हा काळ म्हणजे आव्हानात्मक काळ असतो. कारण त्यानंतर लागलीच निवडणुकीला सामोरे जावे लागते. हे आव्हान आपण समर्थपणे पेलले आहे यातच आपल्याला समाधान असल्याचे रजनी नाईक यांनी सांगितले.
 

Web Title: The importance given to water schemes with health, education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.