शहाद्यात पोलीसावर शस्त्र उगारुन शासकीय कामात अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 11:57 IST2019-09-14T11:57:30+5:302019-09-14T11:57:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबर : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचा:याशी वाद घालून त्याच्यावर धारदार शस्त्र उगारुन हल्ला करण्याचा प्रयत्न करणा:या ...

शहाद्यात पोलीसावर शस्त्र उगारुन शासकीय कामात अडथळा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबर : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचा:याशी वाद घालून त्याच्यावर धारदार शस्त्र उगारुन हल्ला करण्याचा प्रयत्न करणा:या पोलीसांनी ताब्यात घेतल़े मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मलोणी भागात ही घटना घडली होती़
शहादा पोलीस ठाण्याचे कर्मचारी मनोज श्रावण सरदार हे मंगळवारी सायंकाळी मलोणी परिसरातील एका भांडणाची चौकशी करत असताना आत्माराम मोतीराम शेमळे रा़ मलोणी याने पोलीस कॉन्स्टेबल सरदार यांच्यासोबत वाद घातला़ दरम्यान त्याने एक लहान धारदार ब्लेड कटर उगारुन हल्ला करण्याचा प्रयत्न करत शासकीय कामात अडथळा आणला़ याप्रकरणी मनोज सरदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आत्माराम शेमळे याच्याविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक क़ेए़ नजन करत आहेत़ संशयित शेमळे यास पोलीसांनी बुधवारी ताब्यात घेतल़े