आरोग्य सेवेत सुधारणा करा : आरोग्य संचालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:07 PM2018-10-15T12:07:33+5:302018-10-15T12:07:40+5:30
आरोग्य संचालकांच्या सूचना : औषधसाठा पुरवठय़ाबाबत नाराजी
नंदुरबार : राज्याचे आरोग्य सेवा संचालक डॉ.कांबळे यांनी रविवारी धडगाव, तळोदा व नंदुरबारात भेट देवून आरोग्य सेवेचा आढावा घेतला. कुपोषण आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी विशेष अॅक्शन प्लॅन तयार करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. आरोग्य विभागातील रिक्त पदांची भरती तातडीने करण्यासाठी कार्यवाही करण्यासाठी आपण प्रय}शील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य सेवेच्या काही उणीवांवर त्यांनी बोट ठेवून सुधारणा करण्याचे आदेश त्यांनी दिले.
आरोग्य सेवा संचालक डॉ.कांबळे यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे. राज्यातील आरोग्य सेवेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या जिल्ह्यांना भेटी देवून ते आरोग्य सेवा सुधारण्यासाठी प्रय}शील आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी रविवारी धडगाव व तळोदा तालुक्यातील आरोग्य सेवांचा आढावा घेतला. शिवाय जिल्हा रुग्णालयातील सेवेचीही त्यांनी पहाणी केली.
सकाळी त्यांनी नंदुरबार जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. विविध विभागात जावून त्यांनी रुग्ण सेवेची पहाणी केली. जिल्हा रुग्णालयात आणखी सुधारणेला वाव असल्याचे सांगून रुग्णांना तात्काळ वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी सर्वानी तत्पर राहावे असे सांगितले. औषध साठा पुरेसा आणि वेळेवर मिळतो किंवा कसे याची पहाणी करून कर्मचा:यांशी संवाद साधला. कुपोषीत बालकांसाठी असलेल्या कक्षाला भेट देवून त्यांच्यावर कसा उपचार होतो. सामान्य श्रेणीत आणण्यासाठी काय प्रय} केले जातात याची माहिती जाणून घेतली. जिल्हा रुग्णालयातील सिकलसेल डायगAोस्टिक सेंटर सुरू करावे. सीटीस्कॅन यंत्रणा तातडीने सुरू करावी. औषधीसाठा पुरेसा उपलब्ध राहील यादृष्टीने पाठपुरावा राहू द्यावा अशा सुचना आरोग्य संचालकांनी दिल्या. वैद्यकीय अधिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी प्रय} करण्यात येणार असल्याचे डॉ.कांबळे म्हणाले. याशिवाय धडगाव ग्रामिण रुग्णालय, चुलवड प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तळोदा ग्रामिण रुग्णालयाला भेट देवून त्यांनी तेथील सुविधांची पहाणी केली. धडगाव ग्रामिण रुग्णलाय आणि चुलवड आरोग्य केंद्रातील सुविधेबाबत त्यांनी अधिका:यांना सुचना दिल्या. सातपुडय़ात सध्या कुपोषण आणि बालमृत्यूचा दर स्थिर असल्याची आकडेवारी पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हा आरोग्य अधिका:यांनी 27 आरोग्य अधिकारी व इतर कर्मचा:यांचा रिक्त पदांचा प्रश्न मांडला. रिक्त जागा तातडीने भरण्यासंदर्भात लवकरच कार्यवाही करणार असल्याचे डॉ.कांबळे यांनी सांगितले.
यावेळी सहायक संचालक पी.शेट्टी, डॉ.के.आर.खरात, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.डी.भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी एन.डी.बोडखे यांच्यासह आरोग्य विभागातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.