नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवसात ४० मद्यपींना पोलिसांकडून कारवाईचा उतारा
By भूषण.विजय.रामराजे | Published: April 11, 2023 05:09 PM2023-04-11T17:09:55+5:302023-04-11T17:10:22+5:30
पोलिसांनी कारवाई केलेल्या ४०पैकी ३५ जणांचे वय १८ ते ४० दरम्यान आहे.
नंदुरबार : जिल्ह्यातील १२ पोलिस ठाण्यांतर्गत गेल्या दोन दिवसात पोलिसांनी ४० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात मद्यपान केलेल्यांच्या अपघातात वाढ झाल्याने पोलिसांकडून मद्यपी चालकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. अक्कलकुवा पोलिस ठाणे हद्दीत २, मोलगी १, धडगाव २, नवापूर ११, विसरवाडी ४, उपनगर ३, नंदुरबार शहर २, तळोदा २ तर म्हसावद पोलिस ठाणे हद्दीत २ असे एकूण ४० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कारवाई झालेले ३५ मद्यपी १८ ते ४० वयोगटातील
पोलिसांनी कारवाई केलेल्या ४०पैकी ३५ जणांचे वय १८ ते ४० दरम्यान आहे. यातही केवळ सहा जण ३० ते ४० वयोगटातील असून, उर्वरित २८ जण तिशीच्या आतील आहेत. मद्यपान केल्यानंतर वाहन चालवून होणारे प्राणघातक अपघात रोखण्यासाठी रविवारी आणि सोमवारी रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास एकाचवेळी पोलिस दलाकडून विशेष मोहीम राबवण्यात आली आहे.