नंदुरबार जिल्ह्यात बाजार समितींसाठी सरासरी ९५ टक्के मतदान

By मनोज शेलार | Published: April 28, 2023 07:40 PM2023-04-28T19:40:38+5:302023-04-28T19:40:42+5:30

नंदुरबार व शहादा बाजार समितीच्या १८ जागांसाठी तर नवापूर बाजार समितीच्या १७ जागांसाठी मतदान झाले. सकाळी ८ वाजेपासून मतदानासाठी रांगा होत्या

In Nandurbar district, the average voting for market committees is 95 percent | नंदुरबार जिल्ह्यात बाजार समितींसाठी सरासरी ९५ टक्के मतदान

नंदुरबार जिल्ह्यात बाजार समितींसाठी सरासरी ९५ टक्के मतदान

googlenewsNext

नंदुरबार : जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर व शहादा बाजार समितीसाठी सरासरी ९५ टक्के मतदान झाले. सर्वत्र शांततेत मतदान झाले असून, शनिवार, २९ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजेपासून त्या - त्या तालुका मुख्यालयी मतमोजणी होणार आहे. 

नंदुरबार व शहादा बाजार समितीच्या १८ जागांसाठी तर नवापूर बाजार समितीच्या १७ जागांसाठी मतदान झाले. सकाळी ८ वाजेपासून मतदानासाठी रांगा होत्या. नंदुरबार बाजार समितीत ९७.८७ टक्के, नवापूर बाजार समितीत ९७.६६ टक्के तर शहादा बाजार समितीत ९६.८७ टक्के मतदान झाले. नंदुरबार व नवापूरमध्ये सरळ लढत तर शहाद्यात तिरंगी लढत रंगली होती. २९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. एकूण सहा फेऱ्या होणार असून, ११ वाजेपर्यंत सर्वच निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

Web Title: In Nandurbar district, the average voting for market committees is 95 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.