मोड येथे बालविकास प्रकल्प केंद्राचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:18 PM2018-07-26T12:18:40+5:302018-07-26T12:19:05+5:30
कुपोषण निमरुलन मोहिम : बालकांसह गरोदर मातांनाही सकस आहार द्यावा
बोरद : तळोदा तालुक्यातील मोड येथे बालविकास प्रकल्प केंद्राचे उद्घाटन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ महेंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आल़े
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच जससिंग माळी, ग्रामपंचायत सदस्य सुभाष ठाकरे, गुलाबसिंग गिरासे, ग्रामविकास अधिकारी शांतीलाल बावा, बालविकास प्रकल्प अधिकारी भाऊसाहेब बोरकर आदी हजर होत़े
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांकडून बालविकास प्रकल्प केंद्राची माहिती देण्यात आली़ बालविकास प्रकल्प अधिकारी भाऊसाहेब बोरकर यांनी केंद्राची उद्दिष्टे सांगितल़े तालुक्यातील कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक असून कुपोषित बालकांचा शोध घेणे गरजेचे आह़े तसेच प्रत्येक गाव पाडय़ात जाऊन बालकांच्या आरोग्य तपासणीची गरजही त्यांनी व्यक्त केली़ गावात कुपोषित बालके राहु नये यासाठी गावात मोठय़ा प्रमाणावर अभियान राबवणे गरजेचे असल्याचे या वेळी सांगण्यात आल़े
सरपंच जयसिंग माळी यांनी सांगितले की, गावात 7 अंगणवाडी असून लहान मुलांसाठी पेसा कायद्यांतर्गत खेळणी, आरोग्य उत्तम रहावे यासाठी पोषक खाद्य देण्यात येत आह़े गाव व पर्यायाने तालुक्यातून कुपोषण हद्दपार करणे गरजेचे असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आल़े
अध्यक्षीय भाषणात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ महेंद्र चव्हाण यांनी सांगितले की, बालकांना अंडी, केळी असा सकस आहार दिल्यास त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल़ बालकांसोबत गरोदर मातांनासुध्दा गरोदर असताना सकस आहार देणे गरजेचे आह़े आईच्या पोटात असताना बाळाला आवश्यक ते सर्व पोषक घटक मिळाले तर बाळ सुदृढ जन्माला येईल़ राज्य व केंद्र शासनाकडून गरोदर मातांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत़ त्याचा लाभ लाभाथ्र्यानी घ्यावा असे आवाहन त्यांनी केल़े
कार्यक्रमात, ग्रामविकास अधिकारी शांतीलाल बावा, अंगणवाडी सेविका छाया सूर्यवंशी, मिराबाई ठाकरे, सिंधू साळवे, रमिला पाडवी, पिंटू ठाकरे, रजनी शिंदे, विमल वळवी, कल्पना पाकुळे, जगदंबा पवार आदी उपस्थित होत़े