आविष्कार 2018 चे शहाद्यात उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 05:25 PM2018-12-27T17:25:36+5:302018-12-27T17:25:41+5:30
शहादा : शहादा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत नंदुरबार जिल्हास्तरीय आविष्कार 2018 चे उद्घाटन शहादा येथील ...
शहादा : शहादा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत नंदुरबार जिल्हास्तरीय आविष्कार 2018 चे उद्घाटन शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात बुधवारी करण्यात आले.
अध्यक्षस्थानी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून दूध संघाचे माजी चेअरमन उद्धव पाटील, रमाकांत पाटील, विद्यापीठाचे पर्यवेक्षक प्रा.आर.एल. शिंदे, प्राचार्य डॉ.सुनील पवार, प्राचार्य डॉ.पी.जी. शिंदे, प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील, प्राचार्य डॉ.एन.जे. पाटील, प्राचार्य एस.एल. पाटील, प्राचार्य बी.के. सोनी, विद्यापीठातून नेमणूक केलेले तज्ञ डॉ.प्रशांत सोनवणे, डॉ.सुधीर भटकर, डॉ.आर.एम. चौधरी, डॉ.मनीषा जगताप, डॉ.पी.के.पाटील, डॉ.आर.एस. खदायते, डॉ.केतन नारखेडे, डॉ.एस.बी. अत्तरदे, डॉ.प्रमोद देवरे, डॉ.रघुनाथ महाजन, डॉ.पी.एस. जैन, डॉ.एस.बी.बारी, डॉ. कल्पेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीदेवी, कवियत्री बहिणाबाई चौधरी, स्व.अण्णासाहेब पी.के. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थी व शिक्षक यांनी नवनवीन शोध करून परिसराचे नावलौकिक करावे. उपस्थित सर्व मान्यवर, पर्यवेक्षक यांनी मार्गदर्शन केले. आविष्कार 2018 मध्ये एकूण चार गट होते. त्यात पदवी, पदव्युत्तर, पदव्युत्तर पदवी व शिक्षक तसेच विभाग निहाय एकूण सहा विभाग होते.
नंदुरबार जिल्ह्यातून वैयक्तिक व समूह मिळून एकूण 206 विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये एकूण सहा विभाग होते. त्यात भाषा, कला, समाजविज्ञान व मानसनिती विभागामध्ये उपकरण एक पोस्टर प्रदर्शन सादरीकरण 28 एकूण 29, विज्ञान विभागामध्ये उपकरण नऊ. तसेच पोस्टर प्रदर्शन सादरीकरण 25 एकूण 34, वाणिज्य, व्यवस्थापन आणि विधी विभागामध्ये पोस्टर प्रदर्शन सादरीकरण सहा एकूण सहा, औषधनिर्माण शास्त्र विभागामध्ये उपकरण एक तसेच पोस्टर प्रदर्शन सादरीकरण 35 एकूण 36, कृषी व पशुपालन विभागामध्ये उपकरण दोन तसेच पोस्टर प्रदर्शन सादरीकरण चार एकूण सहा, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विभागामध्ये उपकरण पाच तसेच पोस्टर प्रदर्शन सादरीकरण तीन एकूण आठ असे एकूण 119 विषय, विभाग व घटकानुसार वैयक्तिक व समूह मिळून एकूण 206 विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग नोंदवला.
यापैकी 18 उपकरण असून त्यांचे प्रात्यक्षिक करून दाखवले तर 101 पोस्टर सादरीकरण प्रदर्शन करून त्यावर माहिती देण्यात आली. उपकरणांच्या प्रात्यक्षिकासाठी टेबल, विद्युत व पाणी अशी सर्व प्रकाराची सोयीसुविधा, सुसज्ज करण्यात आली होती. तसेच विविध विभागातून सहभाग नोंदवलेल्या विद्यार्थी व शिक्षक यांना पोस्टर सादरिकरण प्रदर्शन करून उपस्थित पर्यवेक्षक, तज्ञ व सर्वाना माहीती दिली. विद्यापीठाकडून नेमणूक केलेल्या सर्व तज्ञांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.
अविष्कार 2018 मध्ये सर्वच महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला. याचा निकाल विद्यपिठाच्या संकेत स्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. प्रास्ताविक डॉ.सुनील पवार यांनी केले. अविष्कार 2018 च्या कार्यक्रमासाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक मकरंद पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन प्रा.सैयद हमीद हसनी तर आभार प्रा.विपुल जैन यांनी मानले.
कार्यक्रमासाठी औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्रा.डॉ.जवेश पाटील, प्रा.डॉ.घनश्याम चव्हाण, प्रा.राजेश अहिरराव, प्रा.हेमंत सूर्यवंशी, प्रा.डॉ.सुनीला पाटील, प्रा.संदीप तडवी, प्रा.विपुल जैन, प्रा.सुलभा महाजन, प्रा.योगेश रोकडे, प्रा.अमित धनकानी, प्रा.अमृता पाटील, प्रा.आकाश जैन, प्रा.प्राची दुसाने, प्रा.लक्ष्मी प्रेमचंदानी, प्रा.हितेंद्र चौधरी, कार्यलयीन अधीक्षक दगडू पाटील, कैलास पाटील, सुरेश पाटील, संजय पाटील, दिनेश पाटील, ग्रंथपाल शशिकांत पाटील, कल्पेश पाटील, दैवत पाटील, कन्हैया पाटील व कर्मचा:यांनी परिश्रम घेतले.