नंदुरबारला जनजाती महोत्सवाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

By रमाकांत.फकीरा.पाटील | Published: November 15, 2023 02:19 PM2023-11-15T14:19:42+5:302023-11-15T14:22:04+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती.

inauguration of nandurbar janjati mahotsav by the governor | नंदुरबारला जनजाती महोत्सवाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

नंदुरबारला जनजाती महोत्सवाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

रमाकांत पाटील, नंदुरबार: नंदुरबारमध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्तानं तीन दिवसांच्या जनजाती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाचे उदघाटन राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित पालकमंत्री अनिल पाटील, खासदार हिना गावित सह लोकप्रतिनिचा उपस्थित हा महोत्सव पार पडला यावेळी जनजाती गौरव दिनानिमित्त आलेले राज्यपाल रमेश बैस,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आल. यावेळेस आदिवासी संस्कृतीच प्रतीक असलेल्या मोरपिसांची टोपी घालत त्यांचं स्वागत करण्यात आलं. ही मोरपिसांची टोपी सांभाळताना दोघांचीही कसरत होताना दिसून आली. मात्र या अनोख्या स्वागताचं राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी कौतुक करीत आपुलकीने स्वागत स्वीकारले.  ही मोरपिसांची टोपी ही आदिवासी परंपरेचा एक अविभाज्य घटक आहे.

उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री यांनी आदिवासी बांधवांना संबोधले यावेळी सारो हाय ना बठा म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केली बिरासा मुंडा सारख्या अनेक लोकांच्या पराक्रमामुळे स्वातंत्र्य मिळाले ,आदिवासी समाजाला मुख्यमंत्री प्रवाहात आणण्यासाठी विकासाचे धोरण राबविलेली जातं आहे आदिवासीनी स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा स्मरणात राहावा यासाठी हा गौराव दिन साजरा होत आहे राष्ट्रपती पदी आदिवासींचे प्रतींनीधी असून आदिवासी बांधवासाठी गौरवस्पद बाब आहे .आदिवासी भागाच्या विकासासाठी रस्त्याचे जाळे उभारले जातं आहे त्यासाठी पाच हजार कोटी प्रस्तावित असून आदिवासी वन हक्क दावे मंजूर केले जातं आहेत.राज्यातील एक हजार मंडळानाचा समावेश दुष्काळी भागात समावेश केला गेला आहे तसेच उर्वरित भागांना देखील अन्याय होऊन देणार नाही असे आश्वासन यावेळी दिले.

राज्यपाल रमेश बैस यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पहिल्या जनजातीय समाजाला न्याय आणि सन्मान देण्याचे काम होत आहे तसेच आज अनेक योजणांचे लोकार्पण मोदींनी केले असून आदिवासी समाजाच्या स्वातंत्र्य योगदानाचा विसर पडला होता मात्र या कार्यक्रमामुळे सन्मान गौर देण्याचे काम भारत सरकार आणि राज्य सरकार आदिवासी बांधवाना सक्षम करण्यासाठी काम करीत आहेत तसेच 
आदिवासी विकास विभाग आदिवासी समाजात शिक्षण देण्याचे काम केले जातं आहे देशाच्या विकासात आदिवासीना शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिल्या जातं आहेत खेळामध्ये देखील आदिवासी तरुण पुढे येत आहेत स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आदिवासी विध्यार्थ्यांना सहाय्य केले जातं आहे. आदिवासी योजनाच्या प्रचाराचे काम सरकारने करावे. राज्यात आदिवासी समाजात अनेक लेखक कवी आहेत, त्यांना प्रोत्साहन देऊन समाजाचे कंगोरे समोर आले पाहिजे .आदिवासी भाषांच्या संरक्षसाठी काम केले पाहिजे आदिवासी तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे असे आवाहन यावेळी केले.

कार्यक्रमात झारखंड येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जनजाती महोत्सवात हिरवा झेंडा दाखवत विकसित भारत संकल्प यात्रेचे सुरुवात करण्यात आल्याने   राज्यपाल , मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, पालकंत्री यांनीही नंदुरबारात हिरवा झेंडा दाखवला

Web Title: inauguration of nandurbar janjati mahotsav by the governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.