तळोद्यात ऊस जाळण्याच्या घटना वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:22 PM2018-10-30T12:22:38+5:302018-10-30T12:22:43+5:30
तळोद्यातील वेगवेगळ्या घटना : महावितरणचा हलगर्जीपणा कायम
तळोदा : तळोदा तालुक्यात विविध ठिकाणी उसाच्या शेतात आग लागण्याच्या घटना घडत आह़े रविवारी तळोदा तालुक्यातील दलेलपूर व धानोरा शिवारात शॉर्टसक्रिटमुळे लागलेल्या आगीत ऊस पिकाचे मोठे नुकसान झाल़े दलेलपूर व धानोरा येथे अनुक्रमे अडीच व साडेतीन एकरावरील ऊस जळून खाक झाला आह़े यात संबंधित शेतक:यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आह़े
तळोदा तालुक्यातील दलेलपूर शिवारातील गट क्रमांक 59/2 च्या शेतात शार्टसक्रिटमुळे उसाच्या शेतात प्रचंड आग लागली़ यात अडीच एकरावरील ऊस जळून खाक झाला़ दुपारी 2 वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ शेतमालक सतिश मगनलाल माळी यांच्या मालकीची दलेलपूर शिवारात उसाची शेती आह़े
दुपारी 2 वाजता अचानक शॉर्टसक्रिट झाल्याने यात अडीच एकरावरील ऊस जळून खाक झाला आह़े घटनास्थळी उपस्थित शेतक:यांनी आग लागल्याची घटना माळी यांना दुरध्वनीव्दारे कळवली़ तोर्पयत पाच एकरापैकी अडीच एकरावरील ऊस जळून खाक झालेला होता़ यात माळी यांचे तीन लाखांहून अधिक नुकसान झाले असल्याचा अंदाज आह़े आग लागली त्या वेळी दुपार असल्याने शेताजवळ ब:यापैकी शेतकरी व शेतमजूर होत़े सर्वाच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात उपस्थितांना यश आल़े परंतु तोवर आग सर्वत्र पसरलेली होती़ पोलीस ठाण्यात संबंधित घटनेची अगAीउपद्रवची नोंद करण्यात आली आह़े
दुस:या एका घटनेत तळोदा तालुक्यातील धानोरा शिवारात सुरेश भगवान पाटील यांच्या मालकीच्या शेतात सव्रेनंबर 51 ब मध्ये उसाच्या शेतात पुन्हा शॉर्टसक्रिटमुळे आग लागून सहा एकरापैकी सुमारे साडीतीन एकरावरील ऊस जळून खाक झाला़ आगीमुळे साडेतीन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आह़े पोलीस ठाण्यात या घटनेची अगAीउपद्रव म्हणून नोंद करण्यात आलेली आह़े पुढील चौधरी हवालदार अरुण कोकणी करीत आह़े दरम्यान, तालुक्यात शॉर्टसक्रिटमुळे आग लागून उसाचे क्षेत्र जळण्याच्या घटना सुरुच आह़े त्यामुळे यातून शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान होत आह़े याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आह़े तळोदा तालुक्यात गेल्या महिनाभरापासून शॉर्टसक्रिटच्या घटना वारंवार घडताना दिसून येत आह़े याबाबत शेतक:यांनी अनेक वेळा महावितरणच्या अधिका:यांना भेटून आपले म्हणणे मांडले आह़े परंतु संबंधित अधिका:यांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असत़े उसाच्या शेतात मोठय़ा संख्येने जीर्ण विज तारा झुलताना सहज दिसून येतात़ हवेमुळे वीजतारांचा स्पर्श झाल्यास यातून शॉर्टसक्रिट होत असत़े