घराला लागून जाताय जीवघेण्या वीजतारा : नंदुरबार शहराची स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:23 PM2018-01-20T12:23:53+5:302018-01-20T12:24:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील अनेक ठिकाणी घर, गॅलरी आदींना वीजतारा चाटून जात असल्याचे दिसून येत आह़े अगदी अलगत स्पर्श होईल अशा स्थितीत या वीजतारा असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असत़े त्यामुळे या ठिकाणी महावितरण तसेच नगरपालिकेनेही लक्ष देण्याची आवश्यकता आह़े
अनेक ठिकाणी घराला लागूनच विद्युत पोल आहेत़ त्यामुळे साहजिकच वीजतारा या घराला लागूनच जात असल्याचे दिसून येत असत़े त्यामुळे यातून एखादी मोठा अपघात होण्याचीदेखील शक्यता नाकारता येत नाही़ अनेक ठिकाणी महावितरणच्या वीजतारा लोंबकळलेल्या स्थितीत आह़े त्यामुळे हवेचा वेग वाढला की, या तारा एकमेकांना लागून घर्षण निर्माण होत असत़े त्यामुळे साहजिकच यातून काही वेळा ठिनग्यादेखील पडत असल्याचे अनेक वेळा दिसून येत असत़े
दरम्यान, अनेकांच्या घराला लागूनच वीजतारा गेल्या असल्याने काही नागरिकांना या वीजतारांना प्लॅस्टीकच्या पाईपांचे आवरणदेखील लावण्यात आले आह़े परंतु हा तात्पुरती उपाय असून महावितरणने याबाबत काही तरी कार्यवाही करुन ही समस्या दूर करावी अशी मागणी आता संबंधित नागरिकांकडून करण्यात येत आह़े याबाबत महावितरणशी संपर्क साधला असता अनेक नागरिकांनी आपल्या घराच्या गॅलरीची हद्द अवैध पध्दतीने वाढवली आह़े तसेच घराचे बांधकामदेखील चुकीच्या पध्दतीने झाले असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आल़े त्यामुळे याबाबतीत नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचेही या वेळी सांगण्यात आल़े
त्यामुळे महावितरण व नगरपालिका प्रशासनाने याबाबत काही तरी मध्यम मार्ग काढत वीजतारांबाबत उपाय योजना करावी अशी मागणी आता जोर धरु लागली आह़े नागरिकांनीदेखील घराचे बांधकाम करता नियम पाळणे गरजेचे आह़े