नवापुरात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:14 PM2020-07-16T12:14:19+5:302020-07-16T12:14:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील ३२ व ५८ वर्षीय दोन जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, ६७ वर्षीय कोरोना ...

Increase in the number of corona patients in Navapur | नवापुरात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ

नवापुरात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : शहरातील ३२ व ५८ वर्षीय दोन जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, ६७ वर्षीय कोरोना पॉझिटीव्ह इसमाच्या मुलाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह संख्येत वाढ होत आहे. कोरोना मुक्तीसाठी लोकप्रतिनिधी सरसावले असून, मालेगाव पॅटर्नवर आधारीत काढ्याचे वाटप शहरात सुरू करण्यात आले आहे.
शहरातील शीतल सोसायटीत राहणाऱ्या ६७ वर्षीय वृध्द व मुसलमान मोहोल्ल्यातील २८ वर्षीय महिला मंगळवारी कोरोना पॉझिटीव्ह झाल्याचे स्पष्ट झाले होते. शीतल सोसायटीमधीलच ३२ वर्षीय इसमास कोरोना सदृष्य लक्षणे दिसून आल्याने त्यास जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह आला असून, असाच निगेटिव्ह अहवाल आदर्श नगरातील ५८ वर्षीय इसमाचा आल्याची माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली. या अहवालामुळे शहरास दिलासा मिळाला आहे. दरम्यान शीतल सोसायटीत राहणाºया ६७ वर्षीय कोरोना पॉझिटीव्ह वृध्देच्या मुलासही कोरोनाची संशयित लागण झाल्याची माहिती असून, पिता-पुत्रावर सुरत येथे उपचार सुरू आहेत.
नवापूर शहर लॉकडाऊन काळात कोरोनापासून मुक्त होते. एकही रूग्ण पॉझिटीव्ह आढळून न आल्याने तालुका ग्रीन झोनमध्ये होता. प्रत्येक नागरिक आमचा नवापूर कोरोना मुक्त असल्याचे अभिमानाने सांगत होता. अनलॉकच्या दुसºया टप्यात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला आणि हळू हळू कोरोना पाय पसरवित असल्याने रूग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंता जनक होत चालली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव यापुढे वाढू नये यासाठी तालुका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. लोकप्रतिनिधींची जोड त्यांना आहेच. भरीस भर म्हणून मालेगाव पॅटर्नवर आधारित काढ्याचे वाटप सुरू करुन लोकप्रतिनिधींनी शहरास कोरोनाच्या विळख्यातुन सुटकेसाठी पावले उचलली आहेत. आमदार शिरीष नाईक, नगराध्यक्षा हेमलता पाटील, उपनगराध्यक्ष आरीफ बलेसरिया यांनी नियोजन करून वॉर्ड टु वॉर्ड व होम टु होम या काढ्याचे वाटप सुरू केले आहे. नगरसेवक अय्युब बलेसरिया यांनी आपल्या कार्यालयात उपलब्ध करून दिलेला काढा सर्वांसाठी खुला ठेवला आहे तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावीत यांनीही होम टु होम वाटपासह आपल्या कार्यालयात हा काढा वितरणासाठी उपलब्ध करून ठेवला आहे.
दरम्यान महात्मा गांधी पुतळ्याच्या जवळची दुकाने कंटेनमेंट झोनमुळे बंद ठेवण्यात आल्याने तेथील बॅरिकेटींग काढण्यासाठी बुधवारी प्रयत्न झाला. व्यावसायीकांनी पालिकेत जावून या दिशेने प्रयत्न केलेत. कंटेनमेंट झोनमध्ये शासनाकडून पुरविण्याच्या सोयींबद्दल काहीच हालचाल नसल्याने नागरिक आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी बॅरकेटींग ओलांडून ये जा करताना दिसून आले. या गरजा शासनाकडून पूर्ण करणे अभिप्रेत असताना नागरिकाना प्रतिक्षा व प्रयत्न करावे लागत असल्याचे चित्र आहे. नोकरी करणारे व व्यापारी यांना नियमित तपासणी करून पासेसद्वारे ये-जा करण्याची मुभा दिली जात असताना कुणासही अश्या पासेस न दिले गेल्याने असला काही प्रकारच नसल्याची स्थिती आहे.

Web Title: Increase in the number of corona patients in Navapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.