नंदुरबार जिल्ह्यातील शेतीत ‘ऑर्गेनिक कार्बन’च्या प्रमाणात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:48 PM2018-07-27T12:48:45+5:302018-07-27T12:48:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबारातील शेत जमिनींमधील ऑर्गेनिक कार्बन (सेंद्रीय कर्ब) मध्ये वाढ होत असल्याचे माती परीक्षण नमुन्यांच्या तपासणीअंती स्पष्ट होत आह़े गेल्या तीन वर्षातील आकडे बघता जमिनीतील सुपिकतेत वाढ झाली आह़े
शहादा येथील पुज्य सानेगुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या कृषी महाविद्यालयातर्फे जिल्ह्यातील मातीचे नमुने गोळा करुन माती परीक्षण करण्यात येत असत़े कृषी विभागाकडूनही माती परीक्षण तसेच मृद आरोग्य पत्रिकेसाठी मृदेचे नमुने तपासण्यासाठी कृषी महाविद्यालयात पाठविण्यात येत असतात़ गेल्या तीन वर्षाचे आकडेवारी बघितली असता़ नंदुरबारातील जमिनीमधील सुपिकता वाढत असल्याचा माती परीक्षण नमुन्याच्या माध्यमातून दिसून येत आह़े
जमिनीतील ऑर्गेनिक कार्बनचे प्रमाण जेवढे जास्त तेवढी ती जमिन सुपिक समजण्यात येत असत़े त्यामुळे दरवर्षी जिल्ह्यातील मातीचे नमुने गोळा करुन त्यातील सुपिकतेत किती वाढ झाली आह़े याचे मोजमाप करण्यात येत आह़े त्यानुसार गेल्या तीन वर्षात ऑर्गेनिक कार्बनचे प्रमाण पाहिल्यास त्यात वाढ झाल्याचे दिसून येत आह़े हे नमुने साधारतण तीन वर्गवारीत तपासण्यात येत असतात़ यात, कमी, अधिक व उच्च अशा दर्जात नमुन्यांची तपासणी करण्यात येत़े 0.5 टक्क्यांपेक्षा आर्गेनिक कार्बनचे प्रमाण कमी असल्यास ते कमी प्रमाणात मोडले जात़े 0.5 ते 0.75 प्रमाण असल्यास ते मध्यममध्ये मोडले जात़े तर 0.75 पेक्षा जास्त प्रमाण असल्यास ते उच्च मध्ये मोडले जात असत़े
वर्षनिहाय आकडेवारी
ऑग्रेनिक कार्बनचे प्रमाणाची तपासणी केली असता 2015-2016 मध्ये एकूण 5 हजार 896 माती नमुने तपासण्यात आले होत़े त्यात, 2 हजार 652 माती नमुने कमी, 2 हजार 364 नमुने मध्यम तर 880 नमुने उच्चमध्ये मोडले गेले होत़े
2016-2017 मध्ये एकूण 10 हजार 194 माती नमुन्यांची तपासणी करण्यात आली़ त्यात, 3 हजार 896 माती नमुने कमी, 3 हजार 619 नमुने मध्यम तर 912 नमुने उच्चमध्ये मोडण्यात आले होत़े 2017-2018 मध्यून एकूण 11 हजार 361 माती नमुन्यांची तपासणी करण्यात आली़ त्यात, 2 हजार 278 नमुने कमी, 2 हजार 845 नमुने मध्यम तर 1 हजार 238 माती नमुने उच्चमध्ये मोडण्यात आले आह़े
त्यामुळे गेल्या तीन वर्षातील माती नमुन्यांचा अभ्यास केला असता़ उच्च गटात मोडल्या जाणा:या मातीच्या नमुन्यांची संख्या वर्षागणिक वाढली असल्याचे दिसून येत आह़े नंदुरबारातील शेतजमिनींमधील उपयुक्त घटकांमध्ये वाढ होत असल्याने साहजिकच सुपिकता टिकवून धरण्यास मदत होत आह़े शेती क्षेत्रात होत असलेली प्रगती नवनवीन तंत्रज्ञान आदींचा अवलंब केल्याने सुपिकता टिकवून ठेवण्यास मदत होत असल्याचे अनेक शेतक:यांकडून सांगण्यात आले आह़े
आरोग्य पत्रिकेकडे वाढला कल
शेतक:यांकमध्ये सुरुवातीला मृद आरोग्य पत्रिकेबाबत उदासिनता दिसून आली होती़ परंतु त्यानंतर याचे महत्व पटल्यावर अनेक शेतक:यांकडून आपल्या शेत जमिनीचे आरोग्य, पोषक घटकांचे प्रमान आदी जाणून घेण्याबाबत आता उत्साह वाढला असल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे साहजिकच माती परीक्षणाचे नमून्यांची संख्याही वाढली आह़े शेत जमिनीत ऑर्गेनिक कार्बन म्हणजेच सेंद्रीय कर्बला अनन्यसाधारण महत्व आह़े शेत जमिनीत ऑर्गेनिक कार्बनचे प्रमाण जेवढे अधिक तेवढी त्या जमिनीतील सुपिकतेचा पोत चांगला असले म्हटले जात असत़े कर्बमुळे जमितीनीतील सुपिकता टिकण्यास मदत होत असत़े पिकांच्या मुळाला मातीचे घट पकड निर्माण होण्यास मदत होत़े
जैव वनस्पती, प्राण्यांचे मांस व विष्ठा आदींच्या कुंजण्यातून शेत जमिनीला कर्बची उपलब्धता होत असत़े आपल्या जमिनीतील कर्बचे प्रमाण वाढावे म्हणून शेतकरी शेणखताचा मारा करीत असतात़ त्याच प्रमाणे रोटा व्हेटरच्या माध्यमातूनही जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होत आह़े