म्हसावदला वाढते अतिक्रमण ठरतेय डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:26 AM2021-01-14T04:26:31+5:302021-01-14T04:26:31+5:30

या भागातील ६१ ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला तक्रारी निवेदन देऊन हे बांधकाम त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे. मंगळवारी ...

Increasing encroachment is a headache for Mhasavad | म्हसावदला वाढते अतिक्रमण ठरतेय डोकेदुखी

म्हसावदला वाढते अतिक्रमण ठरतेय डोकेदुखी

googlenewsNext

या भागातील ६१ ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला तक्रारी निवेदन देऊन हे बांधकाम त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे. मंगळवारी रात्रीही एकाने बाजारपेठ भागात रहिवासी घरासमोर चक्क १० बाय १० चे दुकानच आणून ठेवले. बाजारपेठ भागातील ग्रामस्थांनी ते उचलून हनुमान चौकात ठेवले. सकाळी सरपंच आले व त्यांनी सदर दुकान तलाठी कार्यालयाच्या रस्त्यावर ठेवले. दरम्यान, म्हसावद गावाला कोणी वालीच नसल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. तसेच या भागात निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्यही बोलायला तयार नाहीत. गावात वाढणारे पक्के अतिक्रमण, कोठेही टपऱ्या, पत्र्याची दुकाने ठेवून भाडेतत्त्वावर देण्याची पद्धत सुरू झालेली असताना तेरी भी चूप, मेरी भी चूप असा खेळ सुरू आहे. या संपूर्ण प्रकारामुळे गावातील रस्ते रुंद झाले असून, चौकांमध्ये अतिक्रमण वाढल्याने मुख्य चौकच गायब होण्याच्या मार्गावर दिसून येत आहे. तसेच गावात घाणीचेही साम्राज्य वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायत प्रशासन डोळे न करता ठोस उपाययोजना करण्याची मागणी गावातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Increasing encroachment is a headache for Mhasavad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.