मॅरेज ब्युरोच्या नावाने वाढती फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 12:20 PM2019-10-29T12:20:54+5:302019-10-29T12:20:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : नंदुरबार जिल्ह्यासह लगतच्या दोन्ही राज्यांमध्ये मुला-मुलींच्या संख्येतील वाढत्या असमतोलामुळे शहादा तालुक्यासह जिल्ह्याती युवकांना लगAासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बामखेडा : नंदुरबार जिल्ह्यासह लगतच्या दोन्ही राज्यांमध्ये मुला-मुलींच्या संख्येतील वाढत्या असमतोलामुळे शहादा तालुक्यासह जिल्ह्याती युवकांना लगAासाठी विवाह जुळविणा:या संस्थांची मदत घ्यावी लागत आहे. अशा संस्थांकडून संबंधित युवकांसह त्यांच्या पालकांची देखील फसवणूक होत आहे. असा प्रकार थांबविण्यासाठी संबंधित संस्थांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
गुजरात, मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या काही भागातून मुलां-मुलींचे जुळवले जात आहे. त्यात शहादा भागातील युवक देखील विवाहबद्ध होत आहे. परंतु लगA जुळल्यानंतर काही मुलांच्या नातेवाईकांकडे आर्थिक मागणी करीत घटस्फोटाची धमकी देण्याचा प्रकार वाढला आहे, याशिवाय सोन्याची देखील मागणी केली जात आहे. या प्रकारात तथाकथित मॅरेज ब्युरो (लग्न जुळवणा:या संस्था) यांचाही समावेश आहे. जे प्राथमिक नोंदणीची मोठी रक्कम घेत फसवणूक करतात, लग्न झालेल्या युवकांसह त्यांच्या पालकांनाही ताटकळत ठेवतात. हे प्रकार मागील दोन वर्षापासून अधिक वाढले आहे.
ज्या युवकांचे काही कारणांमुळे लग्न होतनाही, जुळत नाहीत त्यांना परिसरातील दलालांमार्फत फसविल्याच्या अनेक घटना घडल्या. या प्रकारात दलालांचे देखील समावेश असून त्यांची मोठी साखळी असल्याचे आढळते. घोर फसवणूक होत असली तरी बदनामीच्या भीतीपोटी पीडित परिवार कुठलीही तक्रार करण्यास पुढे धजावत नाही, त्यामुळे दलालांनी आपले पाय पसरवले आहे.
अशा अनधिकृत व फसवणूक करणा:या वधु-वर सुचक संस्था व दलालांपासून विवाहच्छुक युवक व आपल्या समाजाने जागृत राहावे. या दोन्ही घटकांची योग्य शहानिशा करूनच मुलाचे लगA जुळवण्यासाठी पुढे पाऊल टाकावे, असे आवाहन सामाजिक संस्थाकडून करण्यात येत आहे. मध्यप्रदेशेतील भोपाल, उज्जैन, इंदौर येथे काही खोटे मॅरेज ब्युरो व वधु - वर सुचक मंडळ तथा संस्था आहेत. पुढील फसवणूक टाळण्यासाठी त्यांची चौकशी करीत शासनामार्फत त्यांच्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी पीडित परिवारांकडून करण्यात येत आहे.