नंदुरबार जिल्ह्यात वाहतुक व्यवस्थेवर वाढतोय ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:29 PM2018-02-16T12:29:54+5:302018-02-16T12:30:00+5:30

Increasing tension on the traffic system in Nandurbar district | नंदुरबार जिल्ह्यात वाहतुक व्यवस्थेवर वाढतोय ताण

नंदुरबार जिल्ह्यात वाहतुक व्यवस्थेवर वाढतोय ताण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सध्या लगAसराई सुरु असल्याने नंदुरबारातील वाहतूक व्यवस्थेवर मोठय़ा प्रमाणात ताण जाणवत आह़े रेल्वे गाडय़ा, एसटी बससह सर्वच खाजगी वाहनेही प्रवाशांनी ‘हाऊसफुल्ल’ असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आह़े त्यामुळे एसटी प्रशासनाने हंगामी स्वरुपात एसटी बसफे:यांमध्ये वाढ करावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आह़े
यंदाच्या लगAसराईत लगAतिथासुध्दा भरगच्च आहेत़ त्यामुळे साहजिक दळणवळण व्यवस्थेवर आता प्रचंड ताण जाणवू लागला आह़े शिवाय सातबारा येथे आदिवासी बांधवांची कुलदैवत याहामोगी मातेचा यात्रोत्सवदेखील सुरु असल्याने जिल्ह्यातून               शेकडो भाविक या यात्रोत्सवाला रेल्वे, एसटी बस तसेच वाटेल त्या            वाहनाने जात असल्याचे चित्र              दिसून येत आह़े त्यामुळे यात्रोत्सवासाठीही एसटी बसेस जादा वाढवून द्याव्या अशी मागणी            करण्यात येत आह़े त्याच प्रमाणे सुरत-भूसावळ पॅसेंजर, अमरावती            एक्सप्रेस, चैन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस यातदेखील प्रवाशांची मोठय़ा संख्येने गर्दी                 होत असल्याचे दिसून येत आह़े               रेल्वे प्रशासनाने एक हंगामी               लोकल गाडी वाढवावी, अशी         मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आह़े 
जागा मिळवण्यासाठी झटापट.
रेल्वे तसेच एसटी बसेसमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवाशांमध्ये झटापट होत आह़े एसटी बसने आगारात प्रवेश करता प्रवाशांकडून खिडकीतून रुमाल, बॅग आदी           सामान आसनावर ठेवत जागा मिळवण्यासाठी धडपड दिसून येत आह़े यात                  अनेक वेळा जागेवरुन प्रवाशांमध्ये शाब्दिक चकमकदेखील होत असत़े अनेक लगAाच्या तिथा या रविवारीच असल्याने एसटी बससमध्ये रविवारी मोठय़ा संख्येने प्रवाशांची झुंबळ उडत असल्याचे दिसून येत असत़े 

Web Title: Increasing tension on the traffic system in Nandurbar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.