कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अर्भकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 12:01 PM2020-01-21T12:01:08+5:302020-01-21T12:01:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील आष्टे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नवजात अर्भकाला आपला जीव ...

Infant death due to staff negligence | कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अर्भकाचा मृत्यू

कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अर्भकाचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील आष्टे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नवजात अर्भकाला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप आष्टे येथील मनोज गोकुळ खाडे व ग्रामस्थांनी केला आहे. तसे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दि.१५ जानेवारी रोजी पत्नी कविता खाडे यांना प्रसुतीसाठी दुपारी साडेतीन वाजता दाखल केले. सायंकाळी सव्वासहा वाजता सामान्य प्रसुती झाली. त्याचे वजन दोन किलो ९५० ग्रॅम इतके होते. यावेळी डॉक्टर हजर नव्हते. सर्व तेथील सिस्टरांनी काम पाहीले. दुसºया दिवशी डॉक्टर सकाळी ११ वाजेदरम्यान आले. आईला व मुलाला चेकअप न करता ओपीडी करुन निघून गेले. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात जन्मलेल्या बाळाला व बाळाच्या आईला योग्यरित्या आरोग्य सेवा मिळाली नाही. येथील डॉक्टराची निवासी नियुक्ती असताना देखील ते आष्टे येथे हजर राहत नाहीत. तसेच येथील रुग्णवाहिकेत इंधन नसते.
संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होवून कठोर शासन करण्यात यावे, अन्यथा आष्टे ग्रामस्थ आंदोलन छेडतील, असा इशाराही त्यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर मनोज गोकुळ खाडे, भाऊसाहेब मधुकर गाठे, गणेश भिका खाडे, कैलास वसंत काळे, भुषण आनंदा हेमाडे, शशिकांत प्रकाश खाडे यांच्या सह्या आहेत.

Web Title: Infant death due to staff negligence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.