नंदुरबार जिल्ह्यात साथरोगांचा प्रादुर्भाव
By Admin | Published: July 13, 2017 01:41 PM2017-07-13T13:41:50+5:302017-07-13T13:41:50+5:30
जिल्ह्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना त्याचा त्रास जाणवत आह़े
ऑ लाईन लोकमतनंदुरबार, दि. 13 - जिल्ह्यातील विविध गावे आणि पाडय़ांवर साथरोगांचा प्रादुर्भाव होत आह़े यात डायरिया, अतिसार, ताप आणि हिवतापाची लागण झालेले रुग्ण दैनंदिन समोर येत आहेत़ जिल्ह्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना त्याचा त्रास जाणवत आह़े गेल्या दोन आठवडय़ापासून जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस हजेरी लावत आह़े कमी अधिक प्रमाणात कोसळणा:या पावसामुळे गावांना पाणीपुरवठा करणा:या जलस्त्रोतांचे पाणी दूषित झाले आह़े नंदुरबार, शहादा, तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यात उपाययोजना केल्या गेल्या नसल्याने नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत होत़े या परिणामी जलजन्य आजार वाढत आहेत़ डायरियाचा फैलाव जोमाने होत असल्याचे रुग्णालयांमध्ये दाखल होत असलेल्या रुग्णांवरून दिसून येत आह़े लहान बालकांना अतिसाराची लागण होत असल्याने ग्रामीण भागातील पालक त्रस्त आहेत़ जिल्ह्यातील सर्व 59 प्राथमिक आरोग्य केंद्र व 290 उपकेंद्रांमध्ये उपचार घेणा:यांना आरोग्य विभाग सेवा देत असल्याची माहिती आह़े आरोग्य विभागाकडून यंदा पावसाळ्यात निर्माण होणा:या आपत्कालीन आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थापन केलेली पथके जिल्ह्यात कार्यरत आहेत़ त्यांच्याकडून रुग्णांच्या तपासण्या व उपचार करण्यात येत असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आह़े