मावा व तुडतुडे रोगांचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 11:07 AM2017-10-08T11:07:14+5:302017-10-08T11:07:23+5:30
रांझणी परिसर : आंबाबाग धोक्यात, मार्गदर्शन गरजेचे
लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी : तळोदा तालुक्यातील सातपुडा पायथ्यालगतच्या परिसरातील रांझणी, गोपाळपूर, पाडळपूर, वरपाडा, प्रतापपूर परिसरात आंबा बागांवर मावा तसेच तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाला आह़े परिणामी शेतक:यांमध्ये भितीचे वातावरण आह़े त्यामुळे परिसरात फवारणीला वेग देण्यात आला आह़े
तळोदा तालुक्यात आंबा बागांची संख्या ब:यापैकी आह़े त्यामुळे साहजीकच यातून शेतक:यांना चांगले उत्पादन मिळत असत़े सध्या आंब्यांना चांगलीच पालवी फुटली आह़़े परंतु मावा व तुडतुडेचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े यावर उपाय म्हणून कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार शेतक:यांकडून मोठय़ा प्रमाणावर बुरशीनाशकांची फवारणी करण्यात येत आह़े तळोदा तालुक्यात प्रमुख पिकांबरोबरच आंबा पिकातूनही शेतक:यांची मोठी आर्थिक उलाढाल होत असत़े या परिसरातील आंबा दरवर्षी गुजरात, उत्तर प्रदेश आदी राज्यातील व्यापारी खरेदी करुन देशाच्या कान्याकोप:यात तसेच परदेशातही पाठवत असतात़ परंतु या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे आंबा बागांवर नवे संकट ओढावले असल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे या रोगाच्या प्रादुर्भावाने आंब्याच्या गुणवत्तेत व दर्जावर परिणाम होणार असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े
दरम्यान, मावाच्या प्रादुर्भावात किटक हे पानाला चिकटून राहतात़ व रसाचे शोषण करतात़ यामुळे पानातील उपयुक्त रस शोषले जात असून आंब्याची वाढही खुंटत आह़े तसेच तुडतुडे हे करडय़ा रंगाचे पाचराच्या आकाराचे किटक आहेत़ हे पालवीचा रस शोषण करीत असतात़ तसेच तुडतुडे आपल्या अंगातून पातळ व चिकट रंगाचे द्रव सोडत आहेत़ या चिकट द्रवामुळे बुरशीचा प्रादुर्भाव होत आह़े अशा प्रकारे मावा व तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकाची वाढ खुंटली असून शेतक:यांडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े
दरम्यान, या रोगांमुळे उत्पन्नात घट होणार असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत असली तरी या रोगाची काही शेतक:यांनी तत्काळ दखल घेत बुरशी नाशक फवारणी केली आह़े त्यामुळे या रोगाचा बराचसा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले आह़े
पिकावर अशा पध्दतीने वारंवार होत असलेल्या रोगाच्या प्रादुर्भावाने कृषी विभागाकडून शेतक:यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत आह़े