बामडोदला मिरचीवर पांढ:या माशींचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 12:30 PM2019-10-30T12:30:32+5:302019-10-30T12:30:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादे : जुलैमध्ये लागवड करण्यात आलेल्या नंदुरबार तालुक्यातील मिरचीवर पांढ:या माशींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
लहान शहादे : जुलैमध्ये लागवड करण्यात आलेल्या नंदुरबार तालुक्यातील मिरचीवर पांढ:या माशींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे मिरची पिके वाचविण्यासाठी शेतक:यांची धावपळ होत आहे.
नंदुरबार जिल्ह्यासह परिसरात मिरचीचे सर्वाधिक पीके घेतली जात आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून पळाशी, बामडोद, शिंदे, लहान शहादे, समशेरपूर, बोराळा, कोरीट या भागातील मिरची पिकांवर बोकडय़ा चुरहामुरडा आजारासह पांढ:या माशींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे बहुतांश शेतक:यांमधू मिरची पीक हातून जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या आजारामुळे मिरचीची अपेक्षेनुसार वाढ होत नाही. फळे लागली असली तरी त्याचा आकार लहान दिसून येत आहे. ब:याच झाडाची वाढही खुटत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव पांढ:या माशींमुळे झाल्याचे म्हटले जात आहे. काही शेतक:यांमधून हा आजार रोपवाटीकामधूनच लागण होत असून ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात हा रोग शेतभर पसरत असल्याचे सांगण्यात येतो. त्यामुळे हा आजार टाळण्यासाठी जुले-ऑगस्टमध्येच उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे असे मतही काही अनुभवी शेतक:यांमार्फत सांगितले जात आहे. शेतक:यांमार्फत किटकनाशके, वाढसंवर्धके व विविध प्रमाणातील मिश्रण मिरचीवर फवारणी केली जात आहे.