हळदाणी परिसरात कापसावर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 11:44 AM2017-11-27T11:44:39+5:302017-11-27T11:44:49+5:30
ल कमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नवापूर तालुक्यातील हळदाणीसह लगतच्या परिसरात लागवड करण्यात आलेल्या कापसावर ‘लाल्या’ रोगाचा प्रादुर्भाव झाला आह़े त्यामुळे शेतक:यांमध्ये भितीचे वातावरण आह़े कापसाच्या उत्पन्नात घट होण्याची भिती व्यक्त होत आह़ेहळदाणीसह परिसरात कापसावर ‘लाल्या’ रोगाचा प्रादुर्भाव झाला आह़े या रोगापासून पिकाला संरक्षण मिळावे यासाठी शेतक:यांनी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत़ कापसावरील ‘लाल्या’ रोग तसेच किड व अळीपासून पिकाचा बचाव व्हावा, कापसाचे उत्पन्न वाढावे यासाठी शेतक:यांनी विविध प्रकारचे औषधांची फवारणी केली होती़ परंतु ‘लाल्या’ रोगाच्या प्रादुर्भावात दिवसेंदिवस वाढच होत असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त होत आह़े त्यामुळे कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिसरात भेट देऊन पिकांची पाहणी करावी अशी अपेक्षाही व्यक्त होत आह़े गेल्या अनेक दिवसांपासून या क्षेत्रातील कापसावर ‘लाल्या’ रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आह़े परंतु आता स्थिती हाताबाहेर गेली असल्याचे संबंधित शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े दरम्यान, ‘लाल्या’ रोगामुळे सर्वाधिक नुकसान हे कोरडवाहू शेतक:यांची झाले आह़े या शेतक:यांचे उत्पन्न वर्षातून एकदाच घेता येत आह़े तसेच कोरडवाहू शेतक:यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून पेरणी व लागवड करावी लागत असत़े हे शेतकरी बि-बियाणे, खते घेण्यासाठी सावकार, बँकांकडून कर्ज घेऊन पिकांची पेरणी करीत असतात़ परंतु सुरुवातीला कापूस पिकाची परिस्थिती चांगली असताना शेवटी मात्र कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने येथील शेतकरीदेखील चिंतेत आहेत़ कृषी विभागाकडून येथील शेक:यांना मार्गदर्शनाची अपेक्षा आह़े त्यामुळे कृषी विभागाने या ठिकाणी भेट देऊन रोगाबाबत प्रतिबंधक कार्यवाही करावी अशी मागणी परिसरातील शेतक:यांकडून करण्यात येत आह़े