निवडणूक काळात बँका देणार संशयास्पद व्यवहारांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 09:02 PM2019-03-24T21:02:06+5:302019-03-24T21:02:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : निवडणुक कालावधीत बँकांनी संशयीत मोठय़ा व्यवहारांची  माहिती प्रशासनाला लागलीच द्यावी.  अशा व्यवहारांवर लक्ष ठेवावे ...

Information about suspicious transactions to be issued by banks in the election period | निवडणूक काळात बँका देणार संशयास्पद व्यवहारांची माहिती

निवडणूक काळात बँका देणार संशयास्पद व्यवहारांची माहिती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : निवडणुक कालावधीत बँकांनी संशयीत मोठय़ा व्यवहारांची  माहिती प्रशासनाला लागलीच द्यावी.  अशा व्यवहारांवर लक्ष ठेवावे अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ.बालाजी मंजुळे यांनी बैठकीत दिल्या.
जिल्ह्यातील बँक अधिका:यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुधीर खांदे उपस्थित होते. जिल्हाधिकारी मंजुळे यांनी सांगितले, निवडणुकीची   आदर्श आचारसंहिता सुरू आहे. त्याचे पालन सर्व यंत्रणांनी करणे    आवश्यक आहे. निवडणूक कालावधीत एक लाखापेक्षा अधीकचा व्यवहार झाल्यास त्याची माहिती निवडणूक अधिका:यांना देण्यात यावी. 
दहा लाखापेक्षा अधिकचा व्यवहार झाल्यास आयकर विभागाला तात्काळ सुचना देण्यात यावी. एकाच खात्यातून अनेक खात्यांवर व्यवहार झाल्यास किंवा संशयास्पद रकमा वर्ग केल्याचे आढळल्यास त्याबाबतही माहिती देण्यात यावी. 
बँकांच्या रोख रक्कमेची वाहतूक करणा:या वाहनचालक व कर्मचा:यांनी सोबत आवश्यक कागदपत्रे आणि ओळखपत्रे बाळगणे आवश्यक आहे. निवडणूक लढविणा:या उमेदवारांनी निवडणूक कालावधीत निवडणुकीसंबधी आर्थिक व्यवहारांसाठी बँकेत स्वतंत्र खाते उघडणे आवश्यक आहे. त्यासाठी बँकांनी सहकार्य करावे आणि बँकेमार्फत  देण्यात येणा:या सुविधा उमेदवारांना तात्काळ उपलब्ध करून देण्यात याव्या. 
जिल्ह्यात संसयास्पद व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी आयकर अधिका:यांची नेमणूक करण्यात आली असल्याची आणि निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चावर लक्ष देण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच स्वतंत्र पथके देखील स्थापन करण्यात आली आहेत. निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र खर्च निरिक्षक नेमण्यात येणार आहेत. उमेदवारांना दहा हजारापेक्षा अधिकचे व्यवहार धनादेशाद्वारे करावे लागणार आहेत. उमेदवाराच्या खर्चाची नोंद स्वतंत्र नोंदवहित करण्यात येणार असल्याची   माहितीही यावेळी जिल्हाधिका:यांनी दिली. 

Web Title: Information about suspicious transactions to be issued by banks in the election period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.