अर्भक केंद्रात सुविधेची हमी परंतू काच पेटय़ांची होतेय कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:14 PM2019-07-09T12:14:52+5:302019-07-09T12:14:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयातील नवजात अर्भक संगोपन केंद्रात काचेच्या पेटीतून अर्भक खाली पडल्याची घटना घडली होती़ ...

Infusion of facility at the infant center but the glass is made of belts | अर्भक केंद्रात सुविधेची हमी परंतू काच पेटय़ांची होतेय कमी

अर्भक केंद्रात सुविधेची हमी परंतू काच पेटय़ांची होतेय कमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा रुग्णालयातील नवजात अर्भक संगोपन केंद्रात काचेच्या पेटीतून अर्भक खाली पडल्याची घटना घडली होती़ सर्वसोयी सुविधांयुक्त असलेल्या या केंद्रात काचेच्या पेटय़ांची कमी असल्याने हा प्रकार घडल्याची शक्यता नियुक्त केलेल्या चौकशी समितीने वर्तवली आह़े  
दुर्गम भागातील गर्भवती माता व बालकांना उपचार मिळावे यासाठी नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध कक्षांची निर्मिती करण्यात आली आह़े यात नवजात अर्भक उपचार केंद्राचा समावेश करण्यात आला आह़े या केंद्रात कमी दिवस व कमी वजनाच्या अर्भकांना काचेच्या पेटीत निश्चित तापमानात ठेवून त्यांच्यावर उपचार केले जातात़ जिल्हा रुग्णालयातील चांगल्या दर्जाच्या या सुविधेमुळे महिन्याकाठी 400 माता प्रसूतीसाठी दाखल होतात़ यातील किमान 40  मातांच्या नवजात अर्भकांना कमी वजन किंवा इतर कारणास्तव केंद्रात दाखल करण्यात येत़े सोबतच जिल्ह्यातील दोन उपजिल्हा आणि 11 ग्रामीण रुग्णालयात प्रसूत झालेल्या मातांच्या बालकांनाही याठिकाणी उपचारासाठी आणले जात आह़े यामुळे या कक्षात बालकांना ठेवण्यासही जागा शिल्लक राहत नसल्याचे सांगण्यात आले आह़े परिणामी एका पेटीत दोन किंवा तीन अर्भकांवर चार दिवसांर्पयत उपचार करण्याची वेळी जिल्हा रुग्णालय प्रशासनावर  येऊन ठेपली आह़े एकापेटीत अधिक बालक असल्यानेच त्यातील एक बालक खाली पडल्याचा प्रकार घडल्याने नवजात अर्भक केंद्रातील समस्या ऐरणीवर आल्या आहेत़ 
या समस्येवर मात करण्यासाठी नंदुरबार येथील महिला रुग्णालय आणि अक्कलकुवा येथील नवजात अर्भकांसाठीचे केंद्र तातडीने सुरु करण्याची अपेक्षा व्यक्त होऊ लागली आह़े 

जिल्हा रुग्णालयातील अर्भक केंद्रासाठी शासनाने 24 पेटय़ांची मंजूरी दिली आह़े एकापेटीत साधारणपणे एक बालक ठेऊन त्याच्यावर युव्ही लाईटद्वारे उपचार देत शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो़ परंतू येथे दरदिवशी साधारण 45 अर्भकांना दाखल करण्यात येत़े 1 दिवस ते 1 महिन्याचे वय असलेल्या बालकांचे वजन हे अडीच किलो आत असणे किंवा एखाद्या किरकोळ आजारामुळे प्रकृतीवर परिणाम झाल्यानंतर बाळांना याठिकाणी आणले जात़े 24 पेटय़ांच्या स्वतंत्र कक्षासह चार पेटय़ांचे माता व अर्भकांसाठीचे आणखी एक कक्षही येथे आह़े याठिकाणीही किमान 15 च्या जवळपास बालक आणि मातांना ठेवण्यात येत़े दोन्ही कक्ष मिळून 60 अर्भकांसाठी 60 पेटय़ांची आवश्यकता असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आह़े प्रशासनाने राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे याबाबत पाठपुरावाही केला होता़ परंतू त्यांच्याकडून अद्यापही दखल घेतली गेली नसल्याने जन्मास आल्यापासूनच अर्भकांना दाटीवाटीने उपचार घ्यावे लागत असल्याचा प्रकार घडत आह़े 
 

Web Title: Infusion of facility at the infant center but the glass is made of belts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.