जिल्हा रुग्णालयात काचेच्या पेटीतून अर्भक खाली पडल्याच्या घटनेची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 12:09 PM2019-07-06T12:09:51+5:302019-07-06T12:09:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयाच्या नवजात अर्भक केंद्रात काचेच्या पेटीत ठेवलेले एक दिवसाचे अर्भक अचानक जमिनीवर कोसळल्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा रुग्णालयाच्या नवजात अर्भक केंद्रात काचेच्या पेटीत ठेवलेले एक दिवसाचे अर्भक अचानक जमिनीवर कोसळल्याची घटना घडली होती़ याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़आऱडी़भोये यांनी रुग्णालयांतर्गत चौकशी समिती गठीत केली होती़ समितीकडून शुक्रवारी चौकशी पूर्ण करण्यात आली़
दरम्यान घटनेत जमिनीवर पडलेल्या बाळाची प्रकृती चांगली असून त्याला कोणत्याही प्रकारे गंभीर इजा झालेली नसल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आह़े गुरुवारी पहाटे प्रसूत झालेल्या मातेचे एकदिवसीय बाळ कमी वजनामुळे रुग्णालयाच्या नवजात अर्भक केंद्रात ठेवण्यासाठी आणले गेले होत़े काचेच्या पेटीत ठेवल्यानंतर काही क्षणात तीन फूट उंचीच्या टेबलावर ठेवलेल्या पेटीतून बाळ खाली पडल़े कक्षाबाहेर उभ्या असलेल्या प्रसत मातांच्या नातलगांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या परिचारिकांना याची माहिती दिली होती़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने हालचाली करुन बाळाच्या तपासण्या केल्या़
गुरुवारच्या घटनेनंतर शुक्रवारी सकाळी अतीरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ कांताराव सातपुते व मुख्य अधिपरिचारिका निलिमा वळवी यांच्या समितीने घटनेची चौकशी सुरु केली होती़ अहवाल ते शनिवारी डॉ़ आऱडी़भोये यांना देणार आहेत़
पेटीतून बाळ नेमके खाली कसे पडले याची चौकशी समितीने केली असून अहवाल पूर्ण होईर्पयत माता आणि बालकाची ओळख गोपनिय ठेवली जाणार असल्याचे सांगण्यात आले आह़े याप्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आह़े