त्रिसदस्यीय समितीची सलसाडी आश्रमशाळा येथे पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 08:00 PM2018-08-30T20:00:27+5:302018-08-30T20:00:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : सलसाडी ता़ तळोदा येथील शासकीय आश्रमशाळेत नाशिक येथील आदिवासी आयुक्तांनी नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीने भेट देत पाहणी केली़ गुरुवारी समितीने दिलेल्या भेटीचा अहवाल दोन दिवसात आदिवासी आयुक्त यांना सादर करण्यात येणार आह़े
सलसाडी आश्रमशाळेत शॉक लागून विद्याथ्र्याचा मृत्यू झाल्यानंतर प्रकल्पाधिकारी विनय गौडा यांच्यावर हल्ला होऊन मारहाण झाली होती़ घटनेचे गांभिर्य लक्षात घेत आदिवासी आयुक्तालय नाशिक यांनी तातडीने त्रिसदस्यीय समिती नियुक्त करत पाहणी करण्याचे आदेश दिले होत़े यानुसार गुरूवारी आयुक्तालयातील अधिकारी लक्ष्मीकांत नेवाडकर, सुरेखा जाधव, सहायक प्रकल्प अधिकारी अशोक तांबोळी यांनी भेट देत पाहणी केली होती़ या पाहणीत त्यांनी घटनास्थळ व आश्रमशाळेच्या सुविधांची पाहणी केली़ या समितीने मुख्याध्यापक, व्यवस्थापक, कर्मचारी यांच्याकडून माहिती घेत विविध विषयांवर चर्चा केली़ यावेळी त्यांनी विद्याथ्र्याना मिळणा:या सुविधांची तपासणी केली़ सकाळी 10 वाजेपासून त्यांनी सुरू केलेल्या चौकशी दरम्यान कर्मचा:यांना घटनेच्या दिवशीच्या घडामोडींची विचारणा केली़ यात प्रामु्ख्याने उपस्थित असलेल्या शिक्षकांकडून माहिती जाणून घेतली़
आश्रमशाळा प्रशासनातील कर्मचा:यांचीही यावेळी विचारपूरस करण्यात आली़ सुमारे दोन तासांपेक्षा अधिक वेळ समिती आश्रमशाळेतील विविध भागात फिरून माहिती जाणून घेत होती़
समितीकडून सलसाडी आश्रमशाळेतील पाहणीचा अहवाल दोन दिवसात आयुक्त यांच्याकडे देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े या अहवालानंतर पुढील कारवाई होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े राज्यभरात गाजलेल्या या प्रकरणामुळे आदिवासी विकास विभागाचा भोंगळ कारभारही समोर आला आह़े घटनेनंतर आदिवासी आयुक्त यांनी याठिकाणी भेट देण्याची अपेक्षा होती़ परंतू त्यांनी समिती पाठवून माहिती घेतली आह़े येत्या काळात आयुक्तांकडून दौरा करण्यात येणार असल्याची शक्यता आह़े