कृउबा आवारातच शेतीमाल खरेदी करण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 02:55 PM2019-11-30T14:55:58+5:302019-11-30T14:56:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत़ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : नवापूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत़ यामुळे शेतीमाल बाजार समिती आवारातच व्यापा:यांनी लिलाव पद्धतीने खरेदी विक्री करावा यापद्धतीने खरेदी करणा:या परवाने देण्याची कार्यवाही होणार असल्याचे नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने कळवले आह़े
बाजार समितीने व्यापा:यांना परवाने देण्याची तयारी केली असून बाजारात शेतक:यांनाही योग्य त्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत़ नवापूर येथील बाजार समितीच्या आवारात वखार महामंडळ यांचे अद्यायावत चार हजार मेट्रिक टन साठवण क्षमता असलेले गोदाम आहे. तसेच बाजार समिती आवाराला कुंपण आह़े अद्यायावत तीन लिलाव मोठे शेड असलेली बाजार समिती ही धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्गावर आह़े
नवापूर तालुक्यात खरीप व रब्बी पिके घेत शेतकरी उदरनिर्वाह करतात़ यातून वर्षभर बाजार समितीत धान्य व कडधान्याची आवक सुरु राहत़े शेतक:यांच्या या शेतीमालास योग्य भाव मिळावा यासाठी बाजार समिती प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत़ यात प्रामुख्याने बाजार समितीच्या आवारात शेतमाल खरेदी किंवा लिलाव व्हावा यासाठी कठोर उपाययोजना केल्या गेल्या आहेत़ यांतर्गत नंदुरबार व धुळे जिल्ह्यातून शेतीमाल खरेदीसाठी येणा:या व्यापा:यांनी बाजार समिती आवारातच शेतमाल खरेदी केल्यास त्यांना अनुज्ञप्ती देणार असल्याचे बाजार समितीने कळवले आह़े
बाजार समितीमध्ये लिलाव पद्धतीने शेतीमाल खरेदी विक्री झाल्यास त्याचा योग्य मोबदला मिळणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती मधुकर सुरूपसिंग नाईक व सचिव अमोल पिंपळे यांनी दिली आह़े