चुलवड आश्रमशाळा मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याचे निर्देश : एस.टी.समितीचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:19 PM2018-02-03T12:19:45+5:302018-02-03T12:19:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
धडगाव : चुलवड येथील आश्रमशाळेतील समस्या पाहून आणि विद्याथ्र्याच्या तक्रारी लक्षात घेत तेथील मुख्याध्यापकांवर कारवाईचे निर्देश अनुसूचित जमाती कल्याण समितीने दिल्याने खळबळ उडाली आहे.
15 सदस्यीय समितीच्या तीन सदस्यीय उपसमितीने शुक्रवारी चुलवड व काकडदा या आश्रमशाळांना भेटी दिल्या. आमदार वैभव पिचड, आमदार पांडूरंग वरोरा, आमदार आनंद ठाकुर यांचा त्यात समावेश होता. चुलवड येथील विद्याथ्र्यानी समितीसमोर विविध समस्या मांडल्या. नाश्तामध्ये अंडी किंवा केळी अथवा गुळ किंवा शेंगदाणे देण्याचे निर्देश असतांना गेल्या दीड महिन्यांपासून ते मिळत नसल्याचे विद्याथ्र्यानी सांगितले. शाळेत गेल्या चार महिन्यांपासून वीजच नसल्याचीही बाब विद्याथ्र्यानी समितीच्या निदर्शनास आणून दिली. समितीने मुख्याध्यापक पी.एम.रामटेके यांना याबाबत विचारले असता व कागदपत्रे मागविले असता केळी व अंडी मागविण्यासंदर्भात कुठलाही पत्रव्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे रामटेके यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश समितीने दिले. यामुळे खळबळ उडाली आहे.
काकडदा आश्रम शाळेत गणित व विज्ञान विषयाचे शिक्षक नसल्याचे विद्याथ्र्यानी सांगितले. या ठिकाणी समिती सदस्यांनी भोजनाचीही चव चाखून पाहिली.