पाच दिवसात 941 शेतक-यांचा विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 05:53 PM2018-08-02T17:53:59+5:302018-08-02T17:54:02+5:30
नंदुरबार : जिल्हाधिका:यांच्या आदेशानंतर गत पाच दिवसात जिल्ह्यातील 941 बिगर कजर्दार शेतक:यांनी पिक विमा करून घेतला आह़े पाच दिवस मुदतवाढ दिल्यानंतर कृषी विभागाने शेतक:यांसोबत संपर्क साधून त्यांचा विमा करून घेतल्याचे सांगण्यात येत आह़े
जिल्ह्यात यंदा 2 लाख 61 हजार 670 हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ या पिकांना नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षा मिळावी म्हणून प्रशासनाकडून पिक विमा योजना राबवण्याचा आग्रह करण्यात आला होता़ परंत गेल्या खरीप हंगामात बोंडअळीचे नुकसान ग्राह्य न धरल्याने शेतक:यांनी नाराजी व्यक्त करून पिक विमा नाकारला होता़ जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज घेणा:या 11 हजार शेतक:यांपैकी पाच दिवसांपूर्वी केवळ 741 शेतक:यांनी विमा काढला होता़ तर बिगर कजर्दारांपैकी केवळ 50 शेतकरी विम्यासाठी पुढे आले होत़े याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या कृषी विभागाने कृषी सहायक आणि पर्यवेक्षक यांच्या माध्यमातून शेतक:यांना गळ घालून पाच दिवसात पिक विमा करणा:या बिगर कर्ज कजर्दार शेतक:यांची संख्या 1 हजारार्पयत नेली आह़े यातून किमान 38 लाख रूपये भरणा करण्यात आला असल्याची माहिती आह़े एकीकडे कृषी विभाग पाच दिवसात विमाधारकांची संख्या वाढवत असताना बँकांकडून कर्ज घेणा:या शेतक:यांनी विमा नाकारल्याची स्थिती कायम आह़े बुधवारी जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी व राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिका:यांची बैठक घेण्यात आली़ याबैठकीत विमा योजनेचा आढावा घेण्यात येऊन मुदतवाढीवर चर्चा करण्यात आली़ येणा:या शेतक:यांना योग्य ती मदत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी बँकांच्या अधिका:यांना केल्या़