दुर्गम भागातील तीन लाभाथ्र्याशी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 01:18 PM2019-01-02T13:18:55+5:302019-01-02T13:18:59+5:30
नंदुरबार : स्वत:चे हक्काचे घर मिळाल्यावर कसे वाटते? योजनांचा लाभ मिळतो का? असे विचारून मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घरकुल लाभाथ्र्याशी ...
नंदुरबार : स्वत:चे हक्काचे घर मिळाल्यावर कसे वाटते? योजनांचा लाभ मिळतो का? असे विचारून मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घरकुल लाभाथ्र्याशी संवाद साधला.
लोकसंवाद उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील घरकुल आणि इतर लाभाथ्र्याशी बुधावारी संवाद साधला. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील काही निवडक लाथाथ्र्याना मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. नंदुरबार जिल्ह्यातील तीन लाभाथ्र्याशी त्यांनी संवाद साधला. त्यात माकडकुंड, ता.अक्कलकुवा, नवानगर, ता.शहादा व कोठली ता.नंदुरबार येथील लाभाथ्र्याचा समावेश होता. घरकुल योजनेचा लाभ कसा मिळाला. स्वत:चे घर मिळाल्यानंतर कसे वाटते. एकुण विविध योजनांचा लाभ मिळतो काय? आदी विचारणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यावर लाभार्थ्ीनीही त्यांच्याशी संवाद साधत स्वत:चे घर मिळाल्याचा आनंद काही औरच असल्याचे सांगितले. योजनांचा लाभ मिळण्यासाठी फारशी कसरत राहत नाही. ऑनलाईन सर्व बाबी झाल्यामुळे ते सुटसुटीत झाल्याचेही लाभाथ्र्यानी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत सांगितले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.