बेशिस्त चालकांवर ‘इंटरसेप्टर’ ठेवणार नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 12:19 PM2019-12-05T12:19:02+5:302019-12-05T12:19:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महामार्गावर बेशिस्तपणे वाहन चालवून कायदा मोडणाऱ्या वाहनचालकांवर लक्ष ठेवण्यासाठी महामार्ग सुरक्षा पथकाच्या ताफ्यात इंटरसेप्टर ...

An 'interceptor' will be on the watchtowers | बेशिस्त चालकांवर ‘इंटरसेप्टर’ ठेवणार नजर

बेशिस्त चालकांवर ‘इंटरसेप्टर’ ठेवणार नजर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महामार्गावर बेशिस्तपणे वाहन चालवून कायदा मोडणाऱ्या वाहनचालकांवर लक्ष ठेवण्यासाठी महामार्ग सुरक्षा पथकाच्या ताफ्यात इंटरसेप्टर हे वाहन दाखल झाल़ बुधवारी जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांना वाहनातील साधनांची माहिती देण्यात आली़
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या या पाहणी कार्यक्रमावेळी आमदार राजेश पाडवी, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते़ विसरवाडी महामार्ग पथकाकडे दिलेल्या इंटरसेप्टर कारमध्ये ओव्हर स्पीड, काळी काच, दारू पिऊन वाहन चालविणे, विना हेल्मेट मोटर सायकल चालविणे, सीट बेल्ट न लावणे, वाहन चालवताना मोबाइलवर संभाषण करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतची साधने उपलब्ध आहेत़
पोलीस उपनिरीक्षक अमृत पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय माळी, भानुदास भामरे, योगेश सोनवणे, हेमकांत कुमावत यांनी माहिती दिली़

Web Title: An 'interceptor' will be on the watchtowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.