भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणा:या वृद्ध महिलेवर गुप्तीने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 11:59 AM2019-06-24T11:59:53+5:302019-06-24T11:59:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेही ता़ नवापुर येथे भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी करणा:या 65 वर्षीय वृद्ध महिलेवर एकाने गुप्तीने ...

Intermediaries dealing with the hassle: The elderly woman, Gupte wise | भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणा:या वृद्ध महिलेवर गुप्तीने वार

भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणा:या वृद्ध महिलेवर गुप्तीने वार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शेही ता़ नवापुर येथे भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी करणा:या 65 वर्षीय वृद्ध महिलेवर एकाने गुप्तीने वार करुन जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली़ हल्ल्यात जखमी महिलेवर खांडबारा येथे उपचार सुरु आहेत़ 
शेही येथे शुक्रवारी रात्री हळद समारंभानिमित्त नाचगाणे सुरु होत़े यादरम्यान काही युवकांमध्ये नाचत असताना धक्का लागल्याने वाद झाला़ यातून त्यांच्या हाणामारी झाली़ यावेळी मालतीबाई परशराम वळवी ह्यांनी युवकांना आवर घालून समज देण्याचा प्रयत्न केला़ यात जिवन दासू वळवी याने मालतीबाई यांच्या डाव्या आणि उजव्या कानांवर गुप्तीने वार केला़  दरम्यान पियूष विवेक वळवी याने तलवार तर विश्वनाथ सुदाम वळवी हातात चाकू तर सोबत असलेल्या इतर सहा जणांनी महिलेवर चाल करुन जात जीवे ठार मारण्याची धमकी दिली़ गुप्तीने झालेल्या वारमुळे जखमी महिलेला तात्त्काळ खांडबारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होत़े याठिकाणी जबाब घेतल्यानंतर विसरवाडी पोलीसांनी शनिवारी दुपारी पियूष विवेक वळवी, जीवन वळवी, विश्वनाथ वळवी, मनोज रमेश वळवी, विवेक रमेश वळवी, जीवन रमेश वळवी, पंडीत राजेंद्र वळवी, महेंद्र बापू वळवी, प्रमोद बापू वळवी, दिनेश प्रल्हाद, रविंद्र फुलजी वळवी सर्व रा़ शेही यांच्याविरोधात महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला़ पोलीसांकडून गुन्हा दाखल केल्यानंतर संशयितांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आह़े दरम्यान नवापुर तालुक्यात गेल्या महिनाभरापासून लगAात नाचण्याच्या वादातून हाणामारीचे प्रकार वाढीस लागले आह़े यातून सामाजिक सलोखा धोक्यात आल्याचे बोलले जात आह़े यासोबत लगAाला जाणा:या युवकांचे अपघात पालकांसाठी चिंतेचे कारण बनले आह़े तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप गावीत करत आहेत़ 
 

Web Title: Intermediaries dealing with the hassle: The elderly woman, Gupte wise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.