विद्यार्थी वसतिगृह प्रवेशाला इंटरनेटचा ‘खोडा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 01:13 PM2018-06-29T13:13:18+5:302018-06-29T13:13:31+5:30

Internet 'Khoda' for student hostel admission | विद्यार्थी वसतिगृह प्रवेशाला इंटरनेटचा ‘खोडा’

विद्यार्थी वसतिगृह प्रवेशाला इंटरनेटचा ‘खोडा’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश घेणा:या विद्याथ्र्याचे यंदाही प्रचंड हाल सुरू असून इंटरनेट कनेक्शन बंद पडत असल्याने या विद्याथ्र्याचे ऑनलाइन अर्ज रेंगाळत आहेत़ यातच आधार लिंक असलेले बँक खाते वसतिगृह प्रवेशासाठी सक्तीचे असल्याने पालकांची वेगळी धावपळ सुरू आह़े 
यातून नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत असलेल्या 29 वसतिगृहांमध्ये शाळा आणि महाविद्यालये सुरू होऊनही केवळ 85 नवीन विद्याथ्र्याना प्रवेश मिळू शकला आह़े तळोदा प्रकल्पाच्या अखत्यारित येणा:या धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात अर्ज भरण्यासाठी गेलेले विद्यार्थी दिवसभर इंटरनेट कनेक्शनच्या प्रतीक्षेत बसून राहत असल्याने त्यांचे अजर्ही भरून झालेले नसल्याची माहिती प्रकल्प कार्यालयातून देण्यात आली आह़े विद्याथ्र्याची ही कोंडी सोडवण्याची मागणी आह़े नंदुरबार प्रकल्प कार्यालयांतर्गत नवापूर, शहादा आणि नंदुरबार तालुक्यातील 29 वसतिगृहांमध्ये जुन्या विद्याथ्र्यापेैकी 251 विद्याथ्र्याचे प्रवेश निश्चित झाले आहेत़ तर नवीन विद्याथ्र्यापैकी 245 विद्याथ्र्याचे अर्ज सुरळीतपणे जमा झाले होत़े यातील 85 विद्याथ्र्याचा वसतिगृह प्रवेश पूर्ण होऊन त्यांच्या खात्यावर शासनाकडून पैसे जमा करण्यात आल्याची माहिती आह़े तळोदा प्रकल्प कार्यालयांतर्गत असलेल्या 17 वसतिगृहात प्रवेशासाठी 100 विद्याथ्र्याचे अर्ज आल्याची माहिती आह़े यातील नेमक्या किती विद्याथ्र्याचे प्रवेश निश्चित झाले हे मात्र अद्याप कळविण्यात आलेले नाही़ नवीन विद्याथ्र्याच्या प्रवेशाला गेल्या दोन आठवडय़ांपूर्वी सुरुवात झाली असली तरीही सायबर कॅफे, महा ई-सेवा केंद्र आणि सीएससी सेंटर येथे गेल्यावर आदिवासी विकास विभागाने दिलेली वसतिगृह प्रवेशाची वेबसाईटच ओपन होत नसल्याचे विद्याथ्र्याचे म्हणणे आह़े प्रवेश अर्ज भरण्यासाठी असलेली दुसरी लिंकही ओपन होत नसल्याने विद्यार्थी दर दिवशी चकरा मारत असल्याचे चित्र सध्या तालुकास्तरावर दिसून आल़े
यातून ज्या विद्याथ्र्याचे शाळा आणि महाविद्यालय प्रवेश निश्चित त्यांचे हाल होत आहेत़ वसतिगृहात प्रवेश मिळत नसल्याने अनेकजण घरी तर काही नातेवाइकांकडे थांबून आहेत़ नंदुरबार प्रकल्प कार्यालयांतर्गत 29 वसतिगृहे आहेत़ यात मुलींचे 12, तर मुलांचे 17 वसतिगृह आहेत़ या सर्व 29 वसतिगृहात गेल्या वर्षात त्या-त्या इमारत क्षमतेनुसार साधारण 5 हजार विद्याथ्र्याचे प्रवेश करण्यात आले होत़े गेल्या दोन वर्षापूर्वी आदिवासी विकास विभागाच्या संकेतस्थळावर वसतिगृह प्रवेशाची लिंक देण्यात आली होती़ या ठिकाणी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर विद्याथ्र्याच्या याद्या प्रसारित करून त्यांचे प्रवेश निश्चित केले गेले होत़े विद्याथ्र्याना ऑनलाइन प्रक्रिया समजून घेण्यास अडचण आली होती़ यंदापासून निर्वाह भत्ता, भोजन, शैक्षणिक साहित्य आणि निवासी साहित्याची रक्कम ही शासनाकडून डीबीटीद्वारे विद्याथ्र्याच्या खात्यावर येणार आह़े ही रक्कम खात्यावर यावी म्हणून आधी आधार लिंकिंग असलेले खाते विद्याथ्र्याना काढावे लागत आह़े यात विद्याथ्र्यापेक्षा पालकांची धावपळ होत असून अनेक पालकांना हातची कामे सोडून या कामांना प्राधान्य द्यावे लागत आह़े धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील बँकांमध्ये खाती काढण्यासाठी पालकांच्या दररोज रांगा लागत असून, येथे ऑनलाइन सुविधा नसल्याने आधार लिंक होण्यास महिन्याचा कालावधी लागणार आह़े विद्याथ्र्याच्या अर्जात इंटरनेट कनेक्शन मोठी समस्या ठरत असल्याचे सांगण्यात येत असले तरी नंदुरबार किंवा इतर तालुक्याच्या ठिकाणाहून अर्ज भरतानाही आदिवासी विकास विभागाने दिलेली वेबसाईट ओपन होत नसल्याचे निदर्शनास आले आह़े एखाद्या विद्याथ्र्याने अर्ज भरून टाकल्यास सबमिट करतानाच साईट क्रॅश होत असल्याचे प्रकार घडत आहेत़ यातून विद्यार्थी मग पुन्हा नव्याने अर्ज करत आहेत़ 

यातही आधार क्रमांक लिंक होण्यास अडचणी येत असल्याचे विद्याथ्र्याकडून सांगण्यात आले आह़े विद्याथ्र्याच्या या अडचणींबाबत मात्र दोन्ही प्रकल्प कार्यालयांकडून थातूरमातूर उत्तरे देण्यात आली आहेत़ 
आदिवासी विकास विभागाने यंदापासून जिल्हास्तरावर वसतिगृह प्रवेश घेणा:या विद्याथ्र्यासाठी थेट बँक खात्यात रक्कम जमा करण्याची योजना आणली आह़े केवळ नंदुरबार शहरातील वसतिगृहांना ही योजना लागू होणार आह़े याअंतर्गत विद्याथ्र्याना भोजन भत्ता म्हणून प्रतिमहा 3 हजार, तर 600 रुपये निर्वाह भत्ता मिळणार आह़े तसेच सर्व ठिकाणी प्रवेश घेणा:या विद्याथ्र्याना साधनसामग्रीबद्दल 4 हजार 500 रुपये देण्यात येणार आहेत़

Web Title: Internet 'Khoda' for student hostel admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.