आर्थिक गुन्हे शाखेतर्फे पुष्पदंतेश्वर विक्रीची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:35 PM2017-10-11T12:35:46+5:302017-10-11T12:35:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील समशेरपूर येथील पुष्पदंतेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या विक्री व्यवहारातील चौकशीला सुरूवात झाली असून त्याबाबत कागदपत्र सादर करण्यासाठी पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखा, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने तत्कालीन चेअरमन यांना पत्र दिले आह़े
राज्यातील साखर कारखान्यांच्या विक्रीचा व्यवहार संशयास्पद झाल्याची तक्रार खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती़ त्यासंदर्भात जिल्ह्यातील पुष्पदंतेश्वर साखर कारखान्याच्या विक्रीतही संशयास्पद व्यवहाराबाबत कळवण्यात आले होत़े त्यानुसार ही चौकशी सुरू झाली आह़े याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ़ जय जाधव यांनी पुष्पदंतेश्वर साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमन मूकूंद मोहन चौधरी यांना या कारखान्याच्या कागदपत्रांची माहिती सादर करण्यासाठी 13 ऑक्टोबर रोजी पुणे येथील कार्यालयात बोलावले आह़े
या पत्रामुळे ऊस उत्पादकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली असून या कारखान्याची खरेदी रद्द होईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आह़े