नंदुरबारात ‘ब्लिचिंग पावडर’चा अनियमित वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:47 PM2018-07-31T12:47:49+5:302018-07-31T12:48:05+5:30

1 हजार पाणी नमुने दुषित : 38.69 टक्के नमुने असमाधानकार

Irregular use of 'bleaching powder' in Nandurbar | नंदुरबारात ‘ब्लिचिंग पावडर’चा अनियमित वापर

नंदुरबारात ‘ब्लिचिंग पावडर’चा अनियमित वापर

Next
<p>नंदुरबार : जानेवारी ते जुन 2018 र्पयत करण्यात आलेल्या पाणी तपासणी नमुन्यात तब्बल 1 हजार 111 नमुने दुषित आढळले आहेत़ तर, 296 पाणी नमुन्यांमध्ये ब्लिचींग पावडरचे प्रमाण अत्यंल्प असल्याचे स्पष्ट झाले आह़े त्यामुळे ब्लिचींग पावडरच्या वापराबाबत ग्रामपंचायत प्रशासन उदासिन असल्याचेच यातून दिसून येत आह़े 
सध्या पावसाळा असल्याने या दिवसांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाण्याव्दारे विविध आजार पसरत असतात़ त्यामुळे जिल्हा परिषदेच्या जलशुध्दीकरण मोहिमेअंतर्गत पाण्याच्या निजर्तुकीकरणासाठी पाण्यात ब्लिचींग पावडरचा वापर करणे गरजेचे असत़े परंतु बहुतेक ग्रामपंचायतीकडून याबाबत चालढकल करण्यात येत असल्याचे चित्र तपासणी करुन आलेल्या नमुन्यांवरुन दिसून येत आह़े जून महिन्यात एकूण 122 ‘ब्लिचिंग  पावडर’  पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती़ 
त्यापैकी 29 पाणी नमुन्यांमध्ये ब्लिचिंग पावडरचे प्रमाण आढळले नाही़ तर जानेवारी ते जुनर्पयत तपासण्यात आलेल्या ब्लिचिंग  पावडर नमुने तपासणी अहवालात 765 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यात, 296 नमुन्यांमध्ये ब्लिचिंग पावडरचे प्रमाण अत्यंल्प असल्याचे दिसून आल़े दुषित नमुन्यांचे प्रमाण 38.69 टक्के इतके आह़े 
दरम्यान, ब्लिचिंग पावडर नमुन्यांमध्ये सर्वाधिक दुषित नमूने नवापूर व तळोदा येथील आढळून आलेले आहेत़ त्यांची संख्या प्रत्येकी 95 इतकी आह़े तर त्या खालोखाल शहादा 50, नंदुरबार 47 तर अक्कलकुवा 9 इतके नमुने दुषित आढळून आलेले आहेत़ 
1 हजार 111 पाणी नमुने दुषित
जुन महिन्यात एकूण 2 हजार 467 पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती़ त्यात, 169 नमुने दुषित आढळले होत़े तसेच जानेवारी ते जुन 2018 मध्ये एकूण 13 हजार 975 पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती़ त्यापैकी तब्बल 1 हजार 111 पाणी नमुने दुषित आले होत़े त्यात, नंदुरबार 113, नवापूर 323, शहादा 135, तळोदा 212, अक्कलकुवा 200, धडगाव 128 आदी नमुने दुषित आढळून आलेत़ 
पाण्याचे निजर्तुकीकरण महत्वाचे
सध्या पावसाळा असल्याने ‘व्हायरल फिवर’च्या प्रमाणात वाढ झालेली आह़े त्यामुळे यातून विविध आजारसुध्दा डोके वर काढत आहेत़ जुलाब,  खोकला, डायरीया तसेच पाण्याव्दारे पसरणारे विविध आजारांनी दुर्गम भागातील ग्रामस्थ बेजार आहेत़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून धडगाव सोडून सर्व तालुक्यातील ग्रामपंचायतींना ब्लिचिंग पावडर देण्यात येत असत़े त्या व्दारे पाणी निजर्तुकीकरण करण्यात येत असत़े परंतु बहुतेक ग्रामपंचायती याबाबत उदासिन असल्याचे समोर आलेल्या आकडेवारीतून दिसून येत आह़े अनेक ग्रामपंचायती पावडरचा वापर करण्यास टाळाटाळ करीत असल्याचाही आरोप अनेकांकडून करण्यात येत आह़े यामुळे पाणी दुषित होऊन तसेच पाणी पिण्यात येत आह़े 
आरोग्य विभागाकडून दर महिन्याला संबंधित गावात जात तेथील पाण्याचे नमूने घेत त्यांची लॅबच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत असत़े त्यात विविध रसायनांमुळे दुषित झालेले पाणी नमुने तसेच ‘ब्लिचिंग पावडर’चे अत्यल्प प्रमाणे आढळलेले दुषित पाण्याचे नमुने अशा दोन भागात वर्गीकरण करण्यात येत असत़े 
पाण्यात साधारणत 20 टक्के ब्लिचिंग पावडरचे प्रमाण असणे गरजेचे असत़े 
तेवढे प्रमाण असल्यास पाणी शुध्द व निजर्तुकीकरण झाले असे समजण्यात येत असत़े परंतु जानेवारी ते जुन दरम्यान तब्बल 296 पाणी नमुन्यांमध्ये ब्लिचिंग पावडरचे प्रमाण अत्यंल्प आढळून आलेले आह़े त्यामुळे ऐन पावसाळ्यात अशा प्रकारे दुषित पाणी नमुन्यांची संख्या वाढत असल्योन ग्रामीण भागातील आरोग्य धोक्यात आले असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आह़े दरम्यान जिल्हा प्रशासनाने संबंधित ग्रामपंचायतींना ब्लिचिंग पावडरच्या वापराबाबत तंबी द्यावी अशी मागणी आता सर्वसामान्यांकडून करण्यात येत आह़े 
 

Web Title: Irregular use of 'bleaching powder' in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.