पोस यंत्राला ‘पोसणे’ झाले अवघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 11:55 AM2017-10-28T11:55:52+5:302017-10-28T11:56:01+5:30

स्वस्तधान्य खरेदी-विक्रीत अडथळे : इंटरनेट कनेक्टीव्हीटी सुधारण्याची गरज

It was difficult to 'feed' the POS machine | पोस यंत्राला ‘पोसणे’ झाले अवघड

पोस यंत्राला ‘पोसणे’ झाले अवघड

googlenewsNext

वसंत मराठे । 
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : रेशनमध्ये होणारा काळाबाजार थांबविण्यासाठी शासनाने स्वस्तधान्य दुकानदारांना ‘पोस’ मशिन पुरविली आह़े परंतु नेट कनेक्टीव्हीटीअभावी ही यंत्रे शोभेच्या वस्तू झाल्या असल्याची माहिती आह़े हे चित्र प्रकर्षाने तळोदा तालुक्यातील दुर्गम भागातील गावांमध्ये दिसून येत़े या यंत्रामुळे दुकानदारांबरोबरच ग्राहकदेखील हैराण झाले आह़े नेट कनेक्टीव्हीटीबाबत प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षा       आह़े
रेशनच्या काळाबाजार थांबविण्याबरोबरच या ‘पोस’ प्रमाणालीत पारदर्शीपणा आणण्यासाठी राज्य शासनाने यंदापासून आधार ‘थम’ लागू केले आह़े यासाठी शासनामार्फतच संबंधित स्वस्त धान्य दुकानचालकांना ‘पोस’ मशिन पुरविली आहेत़ या यंत्रामुळे संबंधित लाभाथ्र्याच्या आधार नंबर शोधून यंत्रावर त्याचा ‘थम’ घेऊन त्यास धान्य वितरीत केले            जात़े तळोदा तालुक्यातही 91 गावे आणि 23 पाडय़ांसाठी 108 दुकानदारांना परवाना देण्यात आला आह़े यासाठी येथील पुरवठा शाखेकडून त्यांना साधारण 98 यंत्रे पुरविण्यात आली आहेत़ गेल्या जुलै महिन्यापासून ही यंत्रे दुकानदारांना देण्यात आली आहेत़़ 
तथापि ही प्रणाली दुकानदरांबरोबरच ग्राहकांसाठीदेखील  डोकेदुखी ठरत आह़े कारण धान्य वितरीत करताना सातत्याने नेट कनेक्टीव्हीटीच्या समस्येला तोंड द्यावे लागत असत़े विशेषत सातपुडय़ातील अतिदुर्गम भागातील कोठार, पाढळपूर, खर्डी, बंधारा, राणीपूर, धनपूर, टाकली, जांबाई, धवळीविहीर, रापापूर,चौगाव, इच्छागव्हान, एकधड, वाल्हेरी, आंबागव्हान अशा 30 ते 35 गाव, पाडय़ांमध्ये ही अडचण मोठय़ा प्रमाणात येत असल्याचे सांगण्यात आले आह़े 
अशा ठिकाणी हे ‘पोस’ यंत्रे कुचकामी ठरले आह़े अर्थात जुन्या पध्दतीने लाभाथ्र्याना धान्य वाटप केले जात आह़े पुरवठा विभागाने या दुकानदारांना यंत्रात टाकण्यासाठी  विविध कंपन्याचे सीमकार्ड दिले असले तरी त्या-त्या गावांमध्ये संबंधित कंपनीने टॉवर नसल्याने रेंज उपलब्ध होत नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे          आह़े 
वास्तविक रेशनच्या काळाबाजार थांबविण्यासाठी शासनाने आधार थम प्रणाली वितरण व्यवस्थेत लागू केल्याने साहजिकच जनतेमध्येदेखील समाधान व्यक्त केले जात होत़े परंतु यात सातत्याने तांत्रिक बिघाड होत असल्याने यात बराच वेळ वाया जात आह़े या शिवाय तासन्तास रांगेतही तात्कळत उभे राहावे लागत असल्याची लाभाथ्र्याची व्यथा आह़े तालुक्यातील सपाटीवरील गावांमध्ये रेंज  कमी असल्याच्या अडचणी असल्या तरी तेथेही सततच्या खंडीत वीज पुरवठय़ामुळे बॅटरी चाज्रीगचा प्रश्न निर्माण होत असतो़ 
तसेच लाभाथ्र्याने जोराने अंगठा यंत्रावर दाबला तर दोन वेळा पावत्या यंत्रातून निघतात त्यामुळे दुकानदारदेखील हतबल झाले  आहेत़ ही पोस प्रणाली ग्रामीण भागात सुरळीत करण्यासाठी रेंज कनेक्टीव्हीटी बाबत ठोस उपाय योजना करण्याची गरज आह़े त्याभागात कोणत्या कंपनीची सेवा अधिक प्रभावी आहे या विषयी आपल्या यंत्रणेमार्फत सव्रेक्षण करुन त्या कंपनीचे सीम कार्ड संबंधित दुकानदारांना उपलब्ध करुन दिले पाहिज़े याउलट तिथे ज्यांची रेंज नाह असे सिमकार्ड दुकानदारांना देण्यात आले आह़े या शिवाय ग्रामीण भागात सातत्याने खंडीत होणा:या वीजपुरवठय़ाबाबतही प्रशासनाने    ठोस पावले उचलणे आवश्यक आह़े अन्यथा शासनाने कितीही चांगल्या योजना जनतेसाठी आणल्या मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसेल तर ती योजना कुचकामी ठरत़े त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागाने सार्वजनिक धान्य वितरण प्रणाली सुरळीत आणि पारदर्शी होण्यासाठी नेट कनेक्टीव्हीटी  प्रकरणी ठोस उपाय योजना  करण्याची जनतेची मागणी  आह़े  

Web Title: It was difficult to 'feed' the POS machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.