जळगाव-अक्कलकुवा बसचा अपघात, आठजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:30 PM2018-03-05T12:30:26+5:302018-03-05T12:30:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
चिनोदा : जळगाव येथून अक्कलकुवा येथे जाणारी बस सद्गव्हाण (गुजरात) जवळ पुढे चालणा:या ऊसाच्या ट्रॅक्टरवर आदळून सहा प्रवासी जखमी झाल़े रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली़
बसचालक आणि वाहकही अपघातात जखमी झाले असून बसचे नुकसान झाले आह़े अक्कलकुवा आगाराची एमएच 14 बीटी 0434 ही बस जळगाव येथून परतत असताना रात्री 11 वाजेच्या सुमारास ब:हाणपूर अंकलेश्वर राज्यमार्गावर सद्गव्हाण गावाजवळ अवजड वाहनाला ओव्हरटेक करून बस पुढे गेली़ यावेळी पुढे चालणारा ऊसाने भरलेला ट्रॅक्टर न दिसल्याने बस थेट त्यावर आदळून अपघात झाला़ यात विक्रम यशवंत बडगुजर रा़ अहमदाबाद, शशांक मरकड किनाके वाहक, अक्कलकुवा आगार, शकिलाबी हुसेन, नवशाद बी शेख रमजान, तब्बस्सुमबी शेख अशफाक, रजियाबी याकूब खाटीक, हुसेन सय्यद सुल्तान सर्व रा़ अक्कलकुवा व डी़एस़ढिवरे बसचालक, अक्कलकुवा आगार हे जखमी झाल़े बसचा वेग कमी असल्याने प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या़ याबाबत निझर (गुजरात) पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आह़े ट्रॅक्टरचालक भील याच्यावर उपचार सुरू आहेत़